डॉ. शेळकेला पाच दिवसांची पोलिस कस्टडी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 26, 2020

डॉ. शेळकेला पाच दिवसांची पोलिस कस्टडी.

 डॉ. शेळकेला पाच दिवसांची पोलिस कस्टडी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेंना मदत केली असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या डॉ. निलेश शेळकेचा फरार बोठे शी कुठलाही सहभाग निष्पन्न न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने डॉ. शेळके यास अर्थ गुन्हेशाखेच्या ताब्यात दिले असून न्यायालयाने त्यास 5 दिवसांची ( 30 डिसेंबर पर्यंत ) पोलिस कस्टडी सुनावली आहे.

रेखा जरे खून प्रकरणांमध्ये पोलिसांनी आता अधिक वेगाने तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील पसार आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा शोध लागत नसल्याने एकीकडे पोलिसांची विविध पथके त्याचा शोध घेत आहे व दुसरीकडे बोठेच्या संपर्कातील व त्याला मदत करणार्‍यांवर नजर ठेवली जात आहे. यातूनच मागील चार दिवसांपासून बोठे यांच्या निकटवर्तीयांनी चौकशी पोलिसांनी सुरू केल्या आहे. त्यामुळे या घटनेतील तपासाला अधिक वेग आला आहे. जरे यांच्या खून प्रकरणांमध्ये काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर काल डॉ. शेळके याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यामुळे नगर शहरांमध्ये तो चर्चेचा विषय झाला होता पण या संदर्भात पोलिसांना कोणतेही पुरावे उपलब्ध झाले नाहीत.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची दोन पथके बोठेच्या शोधार्थ पाठवण्यात आलेली होती. मात्र त्या ठिकाणी बोठेऐवजी डॉ. शेळके याचा ठावठिकाणा लागल्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
बोठे याच्या निकटवर्तीयांची व सहकार्‍यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात सध्या चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये बोठे याच्याशी कोणा-कोणाशी संपर्क पूर्वीपासून संपर्क आहे व आताही सुरू आहे, याचा उलगडा चौकशीत केला जात असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर जरे हत्यांकाडाचा सूत्रधार बोठे याला पसार होण्यास मदत करणारे तसेच अजूनही त्याच्या संपर्कात राहून त्याला मदत करणारे पोलिसांनी आता अजेंड्यावर घेतले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मंडळींवर आता कायदेशीर कारवाईचे नियोजन सुरू झाल्याचे समजते. शिवाय, बोठेचा रिव्हॉल्व्हर परवाना रद्द करण्याच्यादृष्टीनेही पोलिसांनी हालचाली सुरू केल्या असल्याचे सांगितले जाते.

No comments:

Post a Comment