पोलीस ‘अ‍ॅक्शन मोड’वर! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 17, 2020

पोलीस ‘अ‍ॅक्शन मोड’वर!

 पोलीस ‘अ‍ॅक्शन मोड’वर!

संगमनेर मधील हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा..
जेऊरमधील जुगार अड्ड्यांवर धाड.. 13 लाखांचा मुद्देमाल जप्त..

श्रीरामपूर, पाथर्डी, नेवासा, शेवगावमधील प्रतिष्ठितांवर गुन्हे दाखल


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कालपासून पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये असून खबर्‍यांचे नेटवर्कमधून मिळत असलेल्या माहितीवर छापे व धाड सुरू आहे. पहिल्या अ‍ॅक्शन मोडमध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी नियुक्त केलेल्या पथकाने नगर तालुक्यातील जेऊर शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात 4 चाकी वाहने 2 चाकी वाहनांचा समावेश आहे. दुसर्‍या अ‍ॅक्शन मोडमध्ये बाबळेश्वर चौकातील हॉटेल ‘यमुना लॉजिंग’मधील हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा टाकून दोन परप्रांतीय महिलांची सुटका करून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

 विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परिक्षेत्रातील अवैद्य धंदे यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पथकाची नेमणूक केलेल्या पथकाने रात्री 12 सुमारास जेऊर गावाचे शिवारात चाफेवाडी रोडचे लगत अंबादास मस्के यांचे मालकाचे शेतातील झाडालगत मोकळ्या जागेत जमिनीवर बसून काही लोक 52 पत्त्याच्या केंद्र मधील अंकावर व चित्रावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळ खेळताना जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला असता तेथे 17 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.यात नगरमधील व्यापार्‍यासह श्रीरामपूर, पाथर्डी, नेवासा, शेवगाव येथील जुगार्‍यांचा समावेश आहे.
जेऊर शिवारात चाफेवाडी रोडलगत अंबादास म्हस्के यांच्या मालकीच्या शेतात झाडाखाली हा जुगार अड्डा चालू होता. आज दि.17 रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यात जुगार्‍याकडून 2 लाख 68 हजार 360 रुपयांची रोख रक्कम, आठ लाख रुपये किंमतीच्या चार चाकी, 2 लाख 30 हजारांच्या मोटारसायकली, 2550 रुपयाचे जुगाराचे साहित्य असा एकूण 13 लाख 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार खेळणार्यांमध्ये विजय चांदमल मुनोत (रा.विनायकनगर, नगर), मुकेश नथ्थुराम मनोदिया, महेश भगवान साळवे, प्रतिक दादासाहेब हिवाळे, शौकत दिलावर शेख, अय्युब अब्बास शेख, जमिर निजाम शेख, अविनाश बाळासाहेब तोडमल, मधुकर नाथाजी मोहिते, प्रणव सुनिल पंचमुख, दत्तात्रय रामदास गवळी, समिर जाकीर शेख, अझरूद्दीन चांद तांबोळी, अश्पाक कय्यूम शेख, दीपक देविदास पवार, मतिन खलीद सय्यद यांचा समावेश आहे. एम. आय. डी. सी पोलीस ठाण्यात भाग 06 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई ही मा. विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री. डॉ. प्रतापराव दिघावकर सो नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली आहे
काल नगरजिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना  बाभळेश्वर चौकातील हॉटेल यमुना लॉजिंग  येथे मालक  नामे प्रवीण  बाळासाहेब पानसंबळ हा महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर, डॉक्टर दिपाली काळे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर याचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे उपअधीक्षक संदिप मिटके, उपअधीक्षक संजय सातव, नोपाणी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर शहर, अभिनव त्यागी, स.पो.नि. समाधान पाटील व कर्मचारी यांचे पथक तयार करुन हॉटेल  यमुना लॉजिंग येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत महिलांची सुटका केली असून आरोपी  प्रवीण बाळासाहेब पानसंबळ, रा निर्मळ पिंपरी ता राहता अरबाज मोहमद शेख रा बाभलेश्र्वर यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द  लोणी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे भा. द. वि. कलम 370 सह  स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956  चे कलम  3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment