बोठेच्या अटकपूर्व जामीनावर युक्तिवाद पूर्ण.उद्या निर्णयाची शक्यता? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 15, 2020

बोठेच्या अटकपूर्व जामीनावर युक्तिवाद पूर्ण.उद्या निर्णयाची शक्यता?

 बोठेच्या अटकपूर्व जामीनावर युक्तिवाद पूर्ण. उद्या निर्णयाची शक्यता?

रेखा जरे हत्याप्रकरणात रोज नवीन ट्विट...

तारीख  पे  तारीख.. 


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रेखा जरे हत्याप्रकरणातील संशयित प्रमुख आरोपी बाळ बोठे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी पूर्ण झाली. पण न्यायालयाकडून याबाबतचा निकाल आजही देण्यात आला नाही. निकाल उद्या देण्यात येणार आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर ’तारीख पे तारीख’ सुरू आहे.सर्व प्रसिद्धी माध्यमांचं, नागरिकांचं लक्ष लागून राहिलेल्या रेखा जरे हत्याप्रकरणात रोज नवे ट्विटस समोर येत असून बोठे यांचा जामीन फेटाळला जाणार की मंजूर होणार? याबाबत संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. आज या प्रकरणाचा निकाल लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच आजच्या सुनावणीत निकाल न लागल्याने चर्चा अफवांना उत आला आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार,पत्रकार बाळ बोठे याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज सकाळच्या सत्रात पुन्हा लांबणीवर पडले आहे. बोठेचे वकील महेश तवले व सरकारी वकील सतीश पाटील यांनी न्यायालयात युक्तिवाद केला दरम्यान यावर दुपारच्या सत्रात न्यायालय काय निर्णय देणार याविषयी उत्सुकता आहे. रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणात बाळ बोठे याचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून पुढे आल्यानंतर तेंव्हापासून तो फरारच आहे. त्याच्या मागावर पोलिस पथके आहेत. आज जामीन अर्जावर तिसर्‍यांदा सुनावणी झाली मात्र, सकाळच्या सत्रात न्यायालयाने काही निर्णय दिलेला नाही.
यावेळी सरकारी पक्षासह आरोपीच्या वकिलांनीही जोरदार युक्तिवाद केला हे युक्तिवादन्यायालयाने पूर्ण ऐकत घेत निकाल राखीव ठेवला आहे.
आरोपीचे वकील महेश तवले यांनी न्यायालयात  म्हटले आहे कि बाळ बोठे याने मे महिन्यात तो काम करत असलेल्या वर्तमानपत्रात हनीट्रॅप विषयी वृत्त प्रकाशित केले होते. त्यामध्ये सागर भिंगारदिवे याचा उल्लेख होता. त्यामुळे बोठे काम करत असलेल्या वर्तमानपत्रातील कर्मचारी व अधिकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल होतील, अशी शक्यता त्यात वर्तवण्यात आली होती. रेखा जरे यांना बोठे मारून टाकतील, असे काही कारण नव्हते. भिंगारदिवे याचा हनी ट्रॅप मालिकेतून पर्दाफाश केला होता. त्यामुळे भिंगारदिवे याला बोठे संपर्क का करतील? जरे यांची सुपारी भिंगारदिवेला का देतील? असा सवाल तवले यांनी उपस्थित केला. तसेच भिंगारदिवे याने नाव घेतले म्हणून बोठे यास पोलीस कोठडीची गरज नाही असेही ते म्हणाले.
यावर सरकारी वकील सतीश पाटील यांनी युक्तिवाद करत म्हणाले की ,तपासी अधिकार्‍यांनी जरे यांच्या घरातून जरे यांनी लिहिलेले एक पत्र हस्तगत केले आहे. त्यामध्ये जरे यांनी बोठे माझा मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचे लिहिले आहे. 24 नोव्हेंबरला करंजी घाटात जरे यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तो प्रयत्नही फसला. त्यानंतर 30 नोव्हेंबरला जरे यांची हत्या करण्यात आली. 24 नोव्हेंबर व 30 नोव्हेंबर रोजी आरोपी बोठे हा सागर भिंगारदिवे, रेखा जरे व विजयमाला माने यांच्या संपर्कात असल्याचे कॉल रेकॉर्ड करून स्पष्ट होत आहे.
हनीट्रॅपच्या बातम्या या फक्त बोठे काम करत असलेल्या वर्तमानपत्रातच छापून आल्या.  पोलिसांच्या कॉल रेकॉर्डमध्ये हत्याकांडाच्या दिवशी बोठे हा सातत्याने जरे यांना संपर्क साधून त्यांचे ठिकाण कुठे आहे, त्याची माहिती घेत होता. तसेच त्यानंतर बोठे याचे सागर भिंगारदिवे याला अनेकदा फोन झाले आहेत. याचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्यामुळे बोठे याचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्याची मागणी सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आली आहे. या वर आता न्यायालया काय निर्णय घेणार याकडे शहरासह राज्याचे लक्ष लागले आहे .

No comments:

Post a Comment