बँक असो.च्यावतीने एनपीए, व्यवस्थापन ज्ञानसत्र संपन्नश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

बँक असो.च्यावतीने एनपीए, व्यवस्थापन ज्ञानसत्र संपन्नश

 बँक असो.च्यावतीने एनपीए, व्यवस्थापन ज्ञानसत्र संपन्नश


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः वित्तीय संस्थेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने एनपीएचे निकष संस्थेच्या हित संरक्षणाच्या दूरदृष्टीने कडू औषध असले तरी विविध स्तरावरील प्रयत्न जारी केल्यास एनपीए प्रमाण कमी होवून नफा क्षमता वाढून संस्थेचे आर्थिक स्थैर्य भक्कम होईल, असे मत देवगिरी नागरी सहकारी बँकेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अभय मंडलिक यांनी व्यक्त केले.
अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांतील अधिकार्यांसाठी आयोजित एन.पी.ए., नॉन बँकिंग अ‍ॅसेट, निर्लेखन इत्यादी विषयांवर ज्ञानसत्रात ते मार्गदर्शन करीत होते. संगमनेर मर्चंट को-ऑप बँकेचे असिसंट जनरल मॅनेजर विजय बजाज या सहभागी प्रशिक्षणार्थीच्या हस्ते ज्ञानसत्राचे अभिनवरित्या उद्घाटन झाले.
 पुढे बोलतांना डॉ.मंडलिक म्हणाले, कर्जवसुलीची जटिल समस्या सर्व कायदेशीर तरतुदींचा उपयोग करुन योग्या वातावरण निर्मितीतून सोडवून मागता क्षणी ठेवी परत करण्याची ठेवीदारांशी असलेली वचनबद्धता सदासर्वदा कायम ठेवून संस्थेची विश्वासर्हता वृद्धीसाठी मोलाचे ठरेल. जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांतील कर्ज वसुली विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. असोसिएशनचे अध्यक्ष सी.ए.गिरीष घैसास यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment