नगरवर धुक्याची शाल! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 18, 2020

नगरवर धुक्याची शाल!

 नगरवर धुक्याची शाल!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
नगर -  नगर शहरावर आज दाट धुक्याची शाल पसरली होती. दाट धुक्यामुळे सूर्यकिरणे सकाळी नऊ वाजता नगरकरांनी अनुभवले. धुक्याबरोबरच वातावरणात काहीसा गारवा देखील होता. धुके सकाळी उशिरापर्यंत असल्याने पक्षी देखील झाडांच्या फांद्यांवर स्थिरावले होते. झाडांच्या पानांवर दव पडलेले होते. या दवमध्ये पक्षीदेखील भिजले होते. दाट धुक्याचा परिणाम दळणवळणावर देखील झाला होता. रस्त्याने वाहनचालकांना दिसत नव्हते. त्यामुळे वाहनाचे दिवे लावून प्रवास होत होता. गेल्या वर्षी देखील नगरकरांनी दाट धुक्याचा अनुभव  घेतला होता. त्याची आठवण यानिमित्ताने पुन्हा झाली. धुके म्हणजे? : धुके हे एक दृश्य ढगासमान असते, ज्यात पाण्याचे अथवा बर्फाचे सुक्ष्म बिंदू असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याजवळ हे हवेत लटकलेले असतात. त्यास एक निम्न पातळीवर असणारा एक प्रकारचा ढग, असेही म्हणतात. नजिकच्या पाण्याच्या स्रोतांचा, उंचसखलतेचा व वार्‍याच्या वेगाचा यावर फार जास्त असर पडतो.

No comments:

Post a Comment