डॉ.बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 18, 2020

डॉ.बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

 डॉ.बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

नगरसेवक डॉ.सागर बोरुडे राज्यातील वैद्यकीय क्षेत्रासाठी आदर्श व्यक्तिमत्व : शेटे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने अहमदनगर शहरात छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक परिसरात अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य डॉ सागर बोरूडे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्पवृक्ष नारळाचे रोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी 300 पेक्षा जास्त लोकांच्या शारीरिक तापमानाची व प्राणवायूची तपासणी करण्यात आली.
यादरम्यान शहरातील उच्च शिक्षीत विद्यार्थी मोठ्या संख्येने स्मारकात उपस्थित होते.
अभिजीत शेटे यांनी डॉ बोरूडेंबद्दल सांगितले की,गेल्या 10 वर्षांपासून डॉ सागर बोरुडे हे वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहेत.डॉ.बोरुडे यांना जनसेवेचा वारसा हा आपल्या आई-वडिलांपासून मिळाला. डॉ बोरूडे यांच्या आई वडिलांनी ग्रामीण भागात वैद्यकीय क्षेत्रात काम करत अनेकांची सुश्रुषा केली. सागर बोरूडेंनी पैशामागे न पडता सेवाभाव जपला; त्यामुळेच आज ते राजकारणात लोकप्रिय नगरसेवक म्हणून सर्वांना परिचित आहेत.* शाल, पुष्पगुच्छ आणि टरबुज देऊन डॉ सागर बोरूडे यांचा सत्कार केला. यावेळी सचिन सापते,अक्षय परभणे,धिरज कुमटकर,आदित्य मोरे,धनंजय हिंगमिरे ढोकणे मामा यशवंत तोडमल आदींसह इतरही विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिवसभरातील वैद्यकीय तपासणीदरम्यान काही लोकांच्या तापमानात वाढ दिसल्याने त्यांना डॉ. बोरुडे यांच्याच दवाखान्यात वैद्यकीय उपचारही देण्यात आले.

No comments:

Post a Comment