आ.रोहित पवारांकडुन कर्जत जामखेड पोलीस ठाण्यांना या वस्तुची भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 18, 2020

आ.रोहित पवारांकडुन कर्जत जामखेड पोलीस ठाण्यांना या वस्तुची भेट

 आ.रोहित पवारांकडुन  कर्जत जामखेड पोलीस  ठाण्यांना या व स्तुची भेट


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत कर्जत-जामखेड येथील पोलिसांना देण्यात येणार्‍या वाहनांंचे वितरण मंत्रालय येथे झाले. गृहमंत्री अनिल देशमुख आणि आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही वाहने स्वीकारली.
आमदार रोहित पवार यांच्या एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने पोलिसांसाठी दोन टाटा योद्धा जीप व चार बजाज मोटर सायकलचे लोकार्पण करण्यात आले. कर्जत-जामखेड पोलीस दलासाठी एकात्मिक विकास संस्थेमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून दिलेली वाहने या दोन्ही तालुक्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करतील. गुन्हेगारी रोखण्यास तसेच सर्वसामान्यांना, माता भगिनींना दिलासा देण्यासाठी उपयुक्त  ठरतील,असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.  कर्जत व जामखेड पोलीस स्टेशन हद्द भौगोलिकदृष्ट्या मोठी आहे. चार जिल्ह्यांच्या सीमा या दोन तालुक्यांना आहेत. तसेच या भागात शाळा व महाविद्यालय जास्त असून शाळेमध्ये येणार्‍या मुलींची संख्याही लक्षणीय आहे. दोन्ही तालुक्याची हद्द मोठी असल्यामुळे येणार्‍या अडीअडचणींवर मात करुन गस्त घालणे सोयीचे होईल यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे ही वाहने देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment