किराणा दुकान फोडून तब्बल 62 हजार रुपयांचा ऐवज पळविला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 16, 2020

किराणा दुकान फोडून तब्बल 62 हजार रुपयांचा ऐवज पळविला

 किराणा दुकान फोडून तब्बल 62 हजार रुपयांचा ऐवज पळविलानगरी दवंडी

श्रीगोंदा प्रतिनिधी : 

श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ या ठिकाणी किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून दुकानात प्रवेश करून दुकानातील तब्बल 62 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याप्रकरणी  हारुण नुरमहंम्मद सय्यद वय 33 वर्ष यांच्या फिर्यादी वरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ याठिकाणी दोस्ती किराणा स्टोअर्स नावाचे दुकान आहे आणि सायंकाळी साडे आठच्या सुमारास दुकानाचे मालक हारून नूर मोहम्मद सय्यद यानी किराणा दुकान बंद करून पत्र्याचे शेडला कडी कोयंडा लावून चावी बरोबर घेऊन घरी गेले असता त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास जेवण करून सर्वजण झोपी गेले असता दिनांक 16 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता किराणा दुकान उघडण्यासाठी गेले असतात दुकानाचा कडी-कोयंडा तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्या तेव्हा त्यांनी त्यांचा भाऊ फरीद यास आवाज दिला आणि दोघांनी आत मध्ये जाऊन पाहिले असता किराणा सामान अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसून आले तसेच काउंटर ची खात्री केली असता काऊंटर मध्ये ठेवलेले तब्बल 27 हजार रुपये त्यांना दिसले नाहीत यावर त्यांची खात्री झाली की अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानात शिरून चोरी केलेली की लक्षात आले त्यामध्ये त्यांचे काउंटर मधील 27 हजार रुपये रोख रक्कम त्यामध्ये 500 रुपये किमतीच्या शंभर शंभर रुपये किमतीच्या तसेच पन्नास रुपये किमतीच्या व दहा रुपये किमतीच्या नोटा तसेच 35 हजार रुपयांचा किराणामाल असा एकूण तब्बल 62 हजार रुपयांची चोरी झाल्याप्रकरणी फिर्यादी हारून सय्यद वय ते30 धंदा किराणा दुकान राहणार कोथळी यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रे फिरू लागली घटनास्थळी अंगुलीमुद्रा तज्ञ यांना बोलाविण्यात आले त्यानंतर काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले मात्र काही अंतरापर्यंत रस्ता दाखवला आणि घुटमळत उभा राहिला आणि त्याने तेथेच त्याचा मार्ग संपला घटनास्थळी पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पठारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश बोराटे धी पोलीस कर्मचार्‍यांनी भेट दिली होती

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here