गायरान क्षेत्रावर केले अवैधपणे अतिक्रमणं... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, November 26, 2020

गायरान क्षेत्रावर केले अवैधपणे अतिक्रमणं...

 गायरान क्षेत्रावर केले अवैधपणे अतिक्रमणं...

महसूल विभागाचे दुर्लक्ष ....

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव हद्दीत असणार्‍या महसूल विभागाच्या गायरान क्षेत्रावर काही इसमानी अवैधपणे अतिक्रमणं केले असुन महसूल विभागाच्या निदर्शनास हि बाब लक्ष्यात आल्यानंतर देखील अतिक्रमण काढून संबंधीत व्यक्तींच्या विरोधात कोणतीही कारवाई महसूल अधिकार्‍यांनी केली नसल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
    तालुक्यातील मढेवडगांव हद्दीत वनविभागाचे गट क्रमांक 8 मध्ये महसूल विभागाची गायरण जमीन असुन या जमिनीलगत असलेल्या म्हातारपिंप्री या गावच्या हद्दीतील काही इसमांनी अवैधपणे महसूल विभागाच्या गायरान क्षेत्रावर अवैधपणे अतिक्रमणं केले असुन या क्षेत्रात त्या इसमांनी विनापरवाना पाईपलाइन करून, अनधिकृतपणे शेततळे बांधून अतिक्रमण केले आहे.तसेच वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता अनेक झाडांची कत्तल केली असून या कडे महसुलच्या अधिकार्‍यानी दुर्लक्ष केल्याचे महसूल विभागाच्या अधिकार्‍याचा आशीर्वाद तर नाही ना? बाब लक्ष्यात आल्यानंतर देखील अतिक्रमण काढून संबंधीत व्यक्तींच्या विरोधात कोणतीही कारवाई महसूल अधिकार्‍यांनी केली नसल्याने परिसरात अशी चर्चा सध्या परिसरात जोर धरू लागली आहे.या अतिक्रमण धारक इसमाला कोणत्या अधिकार्‍याचा आशिर्वाद आहे ? असा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here