पारनेर शहरात सचिन नगरे मित्र मंडळाच्या वतीने संविधानाच्या प्रति वाटप संविधान दिनानिमित्त सामाजिक उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 27, 2020

पारनेर शहरात सचिन नगरे मित्र मंडळाच्या वतीने संविधानाच्या प्रति वाटप संविधान दिनानिमित्त सामाजिक उपक्रम

पारनेर शहरात सचिन नगरे मित्र मंडळाच्या वतीने  संविधान दिनानिमित्त सामाजिक उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर येथे भारतीय संविधान दिनानिमित्त सचिन नगरे मित्र मंडळाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम घेण्यात आले  शासकीय कार्यालयांमध्ये संविधानाच्या प्रति वाटप करण्यात आल्या हा उपक्रम राबवत संविधान दिनानिमित्त लोक जागृती करण्यात आली  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाने दिलेले लोकांना अधिकार व कायदे या बाबत  माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन नगरे दिली
पारनेर शहरांमध्ये शासकीय कार्यालयात संविधानाच्या प्रति वाटप करण्यात आल्या लोकांना संविधानामुळे मिळालेले हक्क स्वातंत्र्य अधिकार याविषयी जागृती करून भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार करण्यात आला यावेळी सचिन नगरे पप्पू औटी ॲड. गणेश कावरे संतोष नगरे दादा शेटे ॲड.संकेत ठाणगे रामकृष्ण पवार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment