शास्ती माफीच्या मुदतीत वाढ करा उपमहापौर - मालनताई ढोणे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 27, 2020

शास्ती माफीच्या मुदतीत वाढ करा उपमहापौर - मालनताई ढोणे

 शास्ती माफीच्या मुदतीत वाढ करा उपमहापौर  -  मालनताई  ढोणे

घरपट्टी, नळपट्टीच्या तक्रारीच मार्गी लागल्या नाहीत त्यामुळे...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत 75% शास्ती माफी एक रकमी भरणा केल्यास लाभ देण्याबाबततचा निर्णय जाहीर केलेला आहे. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांनी प्रतिसाद देत रांगेत उभे राहून घरपट्टी भरणा करीत आहेत. यामुळे महानगरपालिकेसही आर्थिक हातभार लागण्यास मदत झालेली आहे. परंतु शहरातील नागरिकांनी अनेक वर्षापासून घरपट्टी बाबत तक्रार अर्ज दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने घरपट्टी ची फाळणी करणे, नळ कनेक्शन नसतानाही नळपट्टी ची आकारणी करणे घर पडलेले असतानाही घरपट्टीची आकारणी कमी न होणे यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. नागरिकांच्या तक्रारीच मार्गी लागल्या नाहीत त्यामुळे शास्ती माफीच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी उपमहापौर मालन ताई ढोणे यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकल वार यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सौ. ढोणे यांनी म्हटले आहे की एकाच कुळाचे दोन ते चार भाऊ वेगवेगळी घरपट्टी भरणेस तयार असताना त्यांच्या हिस्या  प्रमाणे फाळणी न झाल्यामुळे वेगवेगळी पावती होत नसल्याने घरपट्टी भरण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत. याबाबत नागरिकांनी अर्ज केल्यानंतरही त्यावर लवकर निर्णय होत नसल्याने अशा नागरिकांना शास्ती माफीचा लाभ मिळत नाही. याबाबत नागरिक वसुली लिपीक, कर निरीक्षक, मूल्यनिर्धारण व कर संकलन अधिकारी व मा उपायुक्त यांना भेटून ही त्यांचे समस्या मार्गी लागत नाही याबाबत निर्णय होत नसल्याने घरपट्टी वसुलीची थकबाकी वाढत आहे. या करिता अधिकार्‍यांची नेमणूक करणे आवश्यक आहे व तसेच नागरिकांनी दिलेल्या अर्जानुसार व कागदपत्रांनुसार संबंधित जबाबदारी सोपविलेल्या अधिकार्‍यांनी तात्काळ निर्णय दिल्यास घरपट्टी चा भरणा वाढण्यास मदत व नागरिकांच्या समस्या सुटण्यास महानगरपालिकेकडून सहकार्य अपेक्षित आहे. याकरिता शास्ती माफीची मदतीस वाढ देणे आवश्यक आहे तसेच या संगणक प्रणाली मध्ये रोख अथवा चेकची एकच पावती होत असल्याने वसुलीस अडथळे निर्माण होत असल्याने या प्रणाली मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.
नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याकरिता समिती तातडीने निर्माण करण्यात येऊन नागरिकांच्या समस्येचे निराकरण होण्याकरिता आवश्यक कागदपत्रे घेण्यात यावे व जागेवरच तात्काळ निर्णय देणेबाबतचे कार्यवाही करण्यात यावी तसेच संगणक प्रणाली मध्ये नागरिकांच्या येणार्‍या समस्येचे निराकरण करण्यात येऊन शास्ती माफीची मुदत वाढविणेबाबत लवकरात लवकर निर्णय महानगरपालिकेच्या हिताच्या दृष्टीने घेण्यात यावा ही असेही निवेदनात म्हटले आहे. नगरसेविका सौ. सोनाबाई तायगा शिंदे यांचीही निवेदनावर सही आहे.

No comments:

Post a Comment