कोरोना लसीकरणासाठी टास्क फोर्स! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 24, 2020

कोरोना लसीकरणासाठी टास्क फोर्स!

 कोरोना लसीकरणासाठी टास्क फोर्स!

पंतप्रधानांसमवेत व्हीसीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती..

“कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूडकडून कोरोनाची लस तयार केली जात आहे. त्यामुळे सध्या सीरम इन्स्टिट्यूकडे सर्वांचे लक्ष आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सीरमच्या लसीचे 10 कोटी डोस बाजारात उपलब्ध होणार असल्याचा दावा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला केला आहे. त्यामुळे ही लस विकसित करण्याची प्रक्रिया कुठं पर्यंत आली आहे? आणि कशी सुरू आहे? याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येण्याची शक्यता आहे. यादृष्टीने प्रशासकीय हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या या दौर्‍यामध्ये काही देशाचे राजदूत देखील सहभागी होणार आहेत.


मुंबई ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून कोरोनाला रोखण्यासाठी कोरोना लसींची अत्यंत गरज आहे. या बाबींचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हीसी बैठकीत राज्यातील प्रत्येक नागरिकांना कोरोना लस मिळावी यासाठी राज्यात टास्क कोर्स ची स्थापना करीत असल्याची घोषणा केली.
   आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची  व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस अत्यंत महत्वाची आहे.
   कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला  यांच्याशी सातत्याने बोलत आहोत . महाराष्ट्रात लसीकरण कशारितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे  असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.  देशातील काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 नोव्हेंबरला कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली.. यानंतर, उर्वरित राज्यांचे मुख्यमंत्री दुपारी 12 नंतर वाजेपासून पंतप्रधानांच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत सामील झाले.
    मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा आणि कोरोना लस देण्याच्या रणनीतीवरही या बैठकीत चर्चा होऊ शकेल. पंतप्रधान मोदींनी कोरोनामधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आतापर्यंत अनेकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशभरात दररोज वाढणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या 50 हजाराच्या खाली आली आहे. त्याचबरोबर काही राज्यांमध्ये प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. काही शहरांमध्ये नाईट कर्फ्यू देखील लागू करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment