काटवण खंडोबा रस्त्याच्या कामावरून मनसेची आगरकर व शिवसेनेवर टिका. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, November 24, 2020

काटवण खंडोबा रस्त्याच्या कामावरून मनसेची आगरकर व शिवसेनेवर टिका.

 काटवण खंडोबा रस्त्याच्या कामावरून मनसेची आगरकर व शिवसेनेवर टिका.

श्रेय मिळू नये म्हणून सेना-भाजपाची युती


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः 2 वर्ष भाजपच्या खासदारांनी या काटवन खंडोबा रस्त्याचे काम निधी देण्याच्या आशेवर थांबुन ठेवले होते. त्या खासदारांना देखील या रस्त्याच्या कामा संदर्भात एक फोन देखील केला नाही. ईतक्या दिवसांनंतर या रस्त्याचे काम मनसेने मार्गी लावले त्याचे श्रेय मनसेच्या नितीन भुतारे व पक्षाला नको म्हणुन या कामाचा आव आणण्यासाठी शिवसेना भाजपची अभद्र युती एकत्र आली असुन शिवसेना भाजपच्या नेत्यानी स्वता कामे मार्गी लाऊन कामांचे उद्घाटन करावे  मनसेने मार्गी लावलेल्या कामांचे श्रेय घेऊ नये असा सल्ला देखील  मनसेच्या नितीन भुतारे यांनी शिवसेना नगरसेवक व भाजपचे अभय आगरकर यांना दिला आहे. भुतारे पुढे म्हणाले की खुप दिवसांनी काटवन खंडोबा रस्त्याचा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने वारंवार निवेदन देऊन,अंदोलन करुन दलित वस्ती सुधार निधी योजनेतुन मार्गी लावला. व कामाल सुरवात झाली या कामाकरीता उपायुक्त तसेच शहर अभियंता यांनी सुद्धा खुप मोठा हातभार लावला. परंतु ज्या शिवसेना नगरसेवकांनी या कामाल दलित वस्ती सुधार निधी योजनेतून हे काम करू नये असे पत्र आयुक्तांना देऊन या कामाल विरोध केला तेच नगरसेवक या कामाचे श्रेय घेण्यासाठी उद्घाटन करतात हे जनतेच्या मनाला पटणारे नाही. त्यांच्या बरोबर असणारे भाजपचे जेष्ठ नेते अभय आगरकर यांनी आपल्या 30 वर्ष राजकारणात एक रुपयाचा निधी कधी काटवन खंडोबा रस्त्याला दिला नाही. आणला देखील नाही. उलट मनसने मार्गी लावलेल्या कामाचे उद्घाटन अभय आगरकर यांनी केले. आगरकरांनी या प्रभागा साठी काडीचेही काम आजपर्यंत इतके मोठे नेते असुन देखील केले नाही असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here