भिंगारवाला चौक येथे पोलिस मित्र संघटना व वंदे मातरम युवा प्रतिष्ठानच्या वतीने शहिदांना श्रध्दांजली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, November 28, 2020

भिंगारवाला चौक येथे पोलिस मित्र संघटना व वंदे मातरम युवा प्रतिष्ठानच्या वतीने शहिदांना श्रध्दांजली

 भिंगारवाला चौक येथे पोलिस मित्र संघटना व वंदे मातरम युवा प्रतिष्ठानच्या वतीने शहिदांना श्रध्दांजली


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः 26/11ला मुंबईत झालेल्या दहशतवादी क्रूर हल्ल्यातील शहिद जवानांना पोलिस मित्र संघटन व वंदे मातरम युवा प्रतिष्ठान च्या वतीने  पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. भारत माता की जय..., वंदे मातरम...च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. तर संविधान दिनानिमित्त उपस्थितांना नागरी कर्तव्ये पार पाडण्याची शपथ देण्यात आली.
      पोलिस मित्र  संघटना पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणार्थ साठी तसेच पोलिस व नागरिक यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण करणे, पोलिसांना सहकार्य करणे असे विविध कार्य करत असते. वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान गणपती उत्सव, शिवजयंती, रामनवमी, तसेच सामाजिक बांधिलकी जपण्याचे अनेक उपक्रम राबवत असते.
     यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी 26/11 ला जो दहशतवादी हल्ला झाला त्याची विस्तारित वर्णन सांगितले, कोतवाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत भंगाळे, यावेळी सचिन गोरे, योगेश खामकर, पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष अमित इधाटे, वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतिक बोगावत, उपाध्यक्ष संभव काठेड, महिला अध्यक्षा शारदा होशिंग, अ‍ॅड. सतीश गीते, अ‍ॅड.शिवाजी कराळे, पत्रकार अशोक झोटिंग, अँड. राजेश कावरे, श्याम  भुमकर, ईश्वर बोरा, अमित सोनग्रा, संतोष साळवे, रावसाहेब नागरगोजे, श्रीदेवी आरगोंडा, वैष्णवी मेढे, श्रृतीका दातरंगे, अदित्य गांधी, अबुतलाह शेख, धनेश गांधी, संजय बोगावत, घनश्याम घोलप आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here