हिलिंग की ट्रेनींग विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, November 26, 2020

हिलिंग की ट्रेनींग विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा

 हिलिंग की ट्रेनींग विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट येऊ पहात आहे. कोरोना सोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, हृदयरोग सारखे अनेक आजारांची संख्या वाढतच चालली आहे. मूळ म्हणजे माणसाची रोगप्रतिकार शक्तीच (र्खााीपळीूं झेुशी) कमी होत आहे त्यामुळे आजार बळावला जातो.
शासनातर्फे सुचित केलेल्या सर्व बाबींची काळजी तर घेतलीच पाहिजे त्या सोबतच आपली र्ळााीपळीूं ही वाढवली पाहिजे त्यासाठीच हिलींग की ट्रेनिंग या पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राजयोगा हिलर ग्रुपच्या संचालिका डॉ सुधा कांकरिया यांनी दिली. आज पर्यंत हीलींग एनर्जी चा उपयोग करून 4500 पेक्षा जास्त व्यक्तींना लाभ झाला आहे वाढत्या रोगराईच्या काळात प्रत्येकालाच सेल्फ हीलींग ची टेक्निक यांची विधि समजावी हा या कार्यशाळेत मागचा उद्देश आहे असेही त्या म्हणाल्या
कार्यशाळेमध्ये हिलींग पॉवर म्हणजे काय? ती कुठे असते? ती कशी निर्माण करता येईल? स्वतःच्या किंवा दुसर्‍यांच्या आजारपणात ती कशी वापरता येईल? त्याची विधी काय आहे? त्यापासुन कसा फायदा होतो? त्यामागील विज्ञान काय आहे? ई. बाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येईल. सदर कार्यशाळा अहमदनगर शहरातील माणिक चोक येथील साई सूर्य नेत्रसेवा या दालनात संपन्न होईल. दि 30 नोव्हेंबर 2020 पासून 4 डिसेंबर 2020 पर्यंत रोज संध्याकाळी 6.45 ते 8.45 या कालावधीत संपन्न होईल (वेळेवर सुरू होईल व वेळेवर संपेल) सोशल डिस्टसिंग, मास्क वगैरे सर्व शासकीय नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे आसन व्यवस्था मर्यादित असेल. जे पहिले 25 व्यक्ती नावनोंदणी करतील त्यांनाच त्याचा लाभ घेता येईल. सदर कार्यशाळा मोफत असुन नाव नोंदणी करणे मात्र आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here