कुविख्यात गुन्हेगार ‘बंटी’ 1 वर्षासाठी स्थानबद्ध. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 28, 2020

कुविख्यात गुन्हेगार ‘बंटी’ 1 वर्षासाठी स्थानबद्ध.

 कुविख्यात गुन्हेगार ‘बंटी’ 1 वर्षासाठी स्थानबद्ध.


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्हादंडाधिकारी राजेंद्र भोसले आणि अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणार्‍या विरुध्द एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्याचे दिलेल्या संकेतानूसार महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधिद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळु तस्कर व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम सन 1981 चे कायद्या अंतर्गत बंटी उर्फ भावेश राऊत कुख्यात गुन्हेगारला 1 वर्षाकरीता स्थानबध्द (अटक) करण्यात आले आहे. मिळालेली माहिती नुसार पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी नगर जिल्ह्यातील वाळू तस्कर, तसेच धोकादायक व्यक्ती अवैध धंदे करणारे व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द कडक कारवाई करण्याचे संकेत दिलेले होते. त्या अनुषंगाने धोकादायक व्यक्ती इसम नामे बंटी उर्फ भावेश अशोक राऊत वय-29 वर्षे, रा. लाटेगल्ली, माणिकचौक, ता.जि. अहमदनगर यांचे विरुध्द एमपीडीए कायद्यांतर्गत कोतवाली पोलीस स्टेशन यांनी पाठविलेल्या प्रस्तावावर मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी अंतीम निर्णय घेवून बंटी यास आज पासुन एक वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारित केले आहेत.
    भावेश अशोक राऊत यांस मा. पोलीस अधिक्षक श्री. मनोज पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली  सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. पोलीस निरीक्षक अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर, यांच्या पथकांतील अधिकारी व कर्मचारी यांनी ताब्यात घेवून आज पासून एक वर्षाकरीता नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द (अटक) करण्यात आले आहे.
स्थानबध्द करण्यात आलेला धोकादायक बंटी उर्फ भावेश अशोक राऊत  लाटेगल्ली,  माणिकचौक, ता.जि. अहमदनगर , याचे विरुध्द 9 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. बंटी विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशनला धारदार शस्त्र जवळ बाळगणे, गैरकायदयाची मंडळी जमवुन दंगा करणे व जिवीतास धोका होईल असे कृत्य करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करुन गैरकायदयाची मंडळी जमवुन दगडफेक करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, शस्त्रासह दरोडा टाकणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, अग्नीशस्त्र जवळ बाळगणे, आपखुशीने दुखापत करुन वस्तुची विल्हेवाट लावणे, बदनामी करणे प्रमाणे गुन्हा दाखल आहे. बंटी यांचे विरुध्द प्रस्ताव सादर करुन स्थानबध्द करणे करीता  पोलीस अधिक्षक मनोज पाटील  यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्री. सौरभकुमार अग्रवाल, संदिप मिटके, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, श्री विशाल ढुमे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  अनिल कटके, तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे, कोतवाली पो स्टे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, कोतवाली पो स्टे, सपोनि शिशीरकुमार देशमुख, पोसई गणेश इंगळे, पोसई मधूकर शिंदे, पोहेकॉ संदिप घोडके, भाऊसाहेब कुरुंद, पोना शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, योगेश सातपुते, कमलेश पाथरुट, सागर ससाणे, रोहित येमुल, जालींदर माने, किरण जाधव, स्थागुशा व कोतवाली पोस्टे चे पोहेका कैलास सोणार, पोका मुकुंद दुधाळ,तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अक्षय फलके, यांनी या कारवाईमध्ये मदत केलेली आहे. आगामी काळात वाळू तस्कर, धोकादायक इसम, हातभट्टी दारु माफीया व अवैध धंदे, झोपडपट्टी दादा यांचे विरुध्द एम.पी.डी.ए.कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याचे संकेत पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment