मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांचे आवाहन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, November 26, 2020

मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांचे आवाहन

 कोरोनापासून बचावासाठी खबरदारी घ्या, सुरक्षित रहा

मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांचे आवाहन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः देशातील सर्वच राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही ठिकाणी पुन्हा एकदा कोरोना महामारी उग्ररूप धारण करीत आहे. या पार्श्वभूमीवर भिंगार परिसरातील नागरिकांनी प्रशासनामार्फत निर्गमित केलेल्या कोव्हीड 19 नियमावलींचे अतिदक्षतेने पालन करून सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित शारीरिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर नियमितपणे वापर करावा, कोरोना पासून बचावासाठी खबरदारी घ्यावी व सुरक्षित राहावे असे छावणी मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी आवाहन केले.

    अहमदनगर छावणी परिषद, स्वयम संस्था, पीस फाउंडेशन व रमा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन विद्याधर पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी छावणी परिषदेचे रमेश साके, गणेश भोर, सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य भिंगारदिवे, स्वयम संस्था सातारा येथील सचिन कांबळे, मनोज विधाते, पीस फाउंडेशनच्या रुपाली वाघमारे, दिपक अमृत आदी मान्यवर उपस्थित होते. सदर शिबीरात डॉ.प्रदीप काळपुंड व डॉ. सिताताई भिंगारदिवे या तज्ञ डॉक्टरांची सेवा उपल्ब्ध करण्यात आली होती.
    आधार हाउसिंग फायनान्स आणि वायफोरडी या संस्थाचा माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या आयुष्यमान आधार प्रकल्पाअंतर्गत सदर शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबीरात जवळपास 250 हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. शिबीरामध्ये विषेश उपस्थिती महिला, व ज्येष्ठ नागरीकांची उल्लेखनिय होती तसेच सदर शिबीर शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन घेण्यात आले. तज्ञ डॉक्टरांमार्फत उपस्थित शिबीरार्थीची मोफत आरोग्य तपासाणी करण्यात आली. शिबीरात खास करुन ताप, सर्दी, खोकला. अंगदुखी, अपचन, पोटच्या तक्रारी, डायबेटीज आणि सकस आहार याविषयीही तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन तसेच आवश्यक औषधे वितरीत करण्यात आली. यासोबतच नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेतेच्या दृष्टीकोनातून मास्क व सॅनिटायझर मोफत वितरीत करण्यात आली. निरोगी आरोग्य जगण्यासाठी सतत आरोग्य तपासणी, व फॅमिली डॉक्टरशी सल्ला मसलत आवश्यक असल्याचे यावेळी डॉक्टरांकडून सांगण्यात आले. नागरीकांना निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे म्हणून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येतील असे आयोजकांमार्फत आश्वासित करण्यात आले. स्थानिक नागरीकांचे आरोग्य राहणीमान उंचविण्याच्या उद्देशाने सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरासाठी बोधिसत्व प्रतिष्टान, पंचशीलनगर भिंगार यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment