नज्जू पैलवानांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, November 26, 2020

नज्जू पैलवानांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी

 मनपाची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करणार्‍या नज्जू पैलवानांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः येथील नगरसेवक नजीर अहमद अब्दुल रज्जाक उर्फ नज्जु पैलवान यांचे मिळकतीवरील अनाधिकृत बांधकाम घोषित करुन नगरसेवक पद रद्द करावे अशी निवेदनाद्वारे अरबाज एजाज सय्यद यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.
अरबाज सय्यद यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, वार्ड क्र.11 चे नगरसेवक अहमद अब्दुल रज्जाक उर्फ नज्जु पैलवान यांचे पुढील नमुद मिळकतीमध्ये अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलेले आहे.  नज्जु पैलवान  यांनी मनपाची कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृत व बेकायदेशीर रित्या बांधकाम केले आहे.
   पुढे म्हंटले आहे की, नज्जु पैलवान यांनी मनपा येथे वॉर्ड 11 चे नगरसेवक असुन त्यांनी स्वतःच मनपाचे तसेच शासनाचे सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच झेंडीगेट येथील मिळकतीचे शेजारील जागेमध्ये कुठलाही मालकी हक्क नसतांना त्यांनी अतिक्रमण करुन त्याठिकाणी बेकायदेशीर रित्या बांधकाम केले आहे. नगरसेवक पद भुषवत असताना र्देखल त्यांनी कोणतेही नियम पाळले नसल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
     यावर जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर कारवाई करावी असे आदेश दिले असल्याचे तक्रादार  अरबाज अजाज सय्याद यांनी दिली.

No comments:

Post a Comment