महापालिकेत संविधान दिन साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, November 26, 2020

महापालिकेत संविधान दिन साजरा

 महापालिकेत संविधान दिन साजरा


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते, त्यामुळे हा  संविधान दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय संविधानासंदर्भात जन-जागृती, माहिती व्हावी यासाठी संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार आज महानगरपालिकेत भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान उद्देशिकाची शपथ घेण्यात आली.
     यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त श्रीकांत मायकलवार, नगरसेवक कुमार वाकळे, महेंद्र भैय्या गंधे, रामदास आंधळे, निखिल वारे, उपायुक्त संतोष लांडगे, दिनेश सिनारे, सचिन राऊत, शहर अभियंता सुरेश इथापे, मुख्यलेखाधिकारी प्रविण मानकर, युनियन चे अध्यक्ष अनंत लोखंडे, आनंदराव वायकर, यंत्र अभियंता परिमल निकम, पाणी पुरवठा अधिकारी रोहिदास सातपुते, राजेश लयचेट्टी, शेखर देशपांडे,किशोर कानडे, पुष्कर कुलकर्णी, सोनू चौधरी, निलेश जाधव, शशिकांत देवकर, बंडू इवळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment