दिवसा विद्युत पुरवठा सुरू करण्याची मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 28, 2020

दिवसा विद्युत पुरवठा सुरू करण्याची मागणी.

 रात्री बिबट्याची भीती...

दिवसा विद्युत पुरवठा सुरू करण्याची मागणी.


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यात सध्या बिबट्यांच्या वाढलेल्या वावरामुळे शेतकरी बांधव भयभीत झालेले आहेत. असे असताना आपल्या मार्फत शेतकर्‍यांना दिवसा लाईट न देता रात्री दिली जाते. हा हट्ट कशासाठी ? रात्रीची लाईट भेटत असल्या कारणामुळे इच्छा नसताना शेतकरी बांधवांना जीव मुठीत धरून रात्री शेतात पाणी धरण्यासाठी जावं लागत आहे. यासाठी रात्री ऐवजी दिवसा महावितरणने विद्युत पुरवठा चालू ठेवावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगर तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
    कोकाटे यांनी अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेतात रात्रीच्या वेळी काम करत असताना नकळत काही दुर्दैवी घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? नुकत्याच पाथर्डी, आष्टी ई. ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या बातम्या कानावर येत असताना आपला विभाग काय करत आहे? अशाच घटना तुम्ही नगर तालुक्यात घडण्याची वाट बघत आहात का? अशा एखाद्या घटनेत तालुक्यातील शेतकरी मरण पावल्यानंतर आपण दिवसा लाईट देण्याचा विचार करणार आहात का? तशी घटना घडल्यास आपल्यावर गुन्हा दाखल केला तर चालेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याकडून अपेक्षित आहेत. आणि जर आपण निरोतर असाल तर कृपया नगर तालुक्यातील शेतकरी बांधवांना ताबडतोब दिवसा लाईट उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
    आमच्या मागणीवर आठ दिवसांच्या आत कार्यवाही न झाल्यास भाजपा नगर तालुका तालुक्यातील शेतकर्‍यांच्या समवेत अत्यंत तीव्र स्वरूपाचे ‘जनआक्रोश आंदोलन’ करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment