पेमराज सारडा महाविद्यालयातील नऊ छात्रांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, November 26, 2020

पेमराज सारडा महाविद्यालयातील नऊ छात्रांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड

 पेमराज सारडा महाविद्यालयातील नऊ छात्रांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः पेमराज सारडा महाविद्यालयातील विद्यार्थी व एन.सी.सी विभागातील नऊ छात्रांची भारतीय सैन्य दालामध्ये निवड झाली आहे. यात संचित नवले, किशोर होडगर, विशाल गायकवाड, चांगदेव म्हस्क, नंदकिशोर खंडागळे, मयुर काळे, गणेश बोरुडे या सात जणांची निवड भारतीय थलसेनेत तर समीर शेख आणि मयुर पवार या दोघांची भारतीय हवाई दलामध्ये निवड झाली आहे. या सर्वांना महाविद्यालयाचे एन.सी.सी विभाग प्रमुख लेफ्टनंट अंकुश आवारे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी छात्रांचे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक आणि कार्याध्यक्ष अजित बोरा यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, उपप्राचार्या डॉ. मंगला भोसले, प्रबंधक अशोक असेरी, पर्यावेक्षक डॉ. सुजित कुमावत आदी उपस्थित होते.
     प्रा. शिरीष मोडक म्हणाले, पेमराज सारडा महाविद्यालयातील विद्यार्थी अभ्यास व परिक्षेत अव्वल येण्याबरोबरच विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. प्राध्यापकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थी यश संपादन करत आहेत. भारतीय सैन्यदलात महाविद्यालयातील एकाच वेळी नऊ छात्रांची निवड होणे ही बाब मोठी अभिमानास्पद आहे. निवड झालेले छात्र आपली जवाबदारी चोख बजावत भारताच्या सीमांचे संरक्षण करतील.
    कार्याध्यक्ष अजित बोरा म्हणाले, सारडा महाविद्यालयाच्या नऊ छात्रांना भारतमातेची सेवा करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. हे सर्व भावी सैनिक आपापले कर्त्यव्य बजावत सारडा महाविद्यालायचे नावलौकिक वाढवतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here