नगर कल्याण रोडवरील रेणुकामाता मंदिरातील दानपेटी फोडली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, November 24, 2020

नगर कल्याण रोडवरील रेणुकामाता मंदिरातील दानपेटी फोडली.

 नगर कल्याण रोडवरील रेणुकामाता मंदिरातील दानपेटी फोडली.नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यातील घोडेगाव मधील घोडेश्वरी मंदिरातील 15 किलो चांदीच्या चोरीची घटना ताजी असतानाच नगर - कल्याण रोड वरील लिंक रोड चौकातील रेणुका माता मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. मंदिरातील वेद पाठशाळेचे विद्यार्थी पहाटे उठल्यावर त्यांचे निदर्शनास ही बाब आल्यावर मंदिराचे पुजारी बाळासाहेब कांबळे यांना कल्पना दिली श्री त्रैलोक्य बाळासाहेब कांबळे यांचे फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंदिरात स्टीलची दानपेटी ठेवण्यात आली आहे. बाहेरून स्टीलचा दरवाजा व कडी कोंडा लावण्यात आला होता. तोही तोडण्यात आला आहे. मंदिराच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडून त्यात असलेली 6,000 रुपयांची रक्कम चोरून नेली आहे.500,100,50,10 रुपयांच्या नोटा व 2 रुपयांची नाणी भक्तांनी दानपेटीत टाकली होती ती सर्व चोरी गेल्यामुळे खळबळ उडाली आहे. अन्य मंदिरात ही सावधानता बाळगणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे या घटनेने दाखवून दिले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here