महात्मा फुलेंनी केले सामाजिक विषमतेविरुद्ध बंड पुकारुन समाज सुधारण्याचे काम-विक्रम राठोड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 28, 2020

महात्मा फुलेंनी केले सामाजिक विषमतेविरुद्ध बंड पुकारुन समाज सुधारण्याचे काम-विक्रम राठोड

 महात्मा फुलेंनी केले सामाजिक विषमतेविरुद्ध बंड पुकारुन समाज सुधारण्याचे काम-विक्रम राठोड


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाज सुधारक म्हणून त्यांना ओळखले जाते. ते सामन्यातील असले तरी विचाराने व कर्तुत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारुन समाज सुधारणेचे काम केले.  ते सर्वसामान्यांसाठी  झटणारे ते सेवक होते. हीच शिकवण शिवसेनेने अंगिकारली आहे, त्यामुळे समाज कार्याला शिवसेना प्राधान्य देते, असे प्रतिपादन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी केले.
      महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेच्यावतीने माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी  संभाजी कदम  म्हणाले, महात्मा ज्योतीबा फुले यांनी समाजातील अनिष्ठ रुढी - परंपरा मोडित काढून समाज सुधारणेला प्राधान्य दिले. जो पर्यंत समाजामध्ये असलेल्या अज्ञानाचा नाश होत नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही, ही त्यांची धारणा होते. त्यामुळेच त्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून समाज शिक्षित करण्याचे काम केले. अशा थोरव्यक्तीमत्वाने केलेल्या कार्यामुळेच समाजसुधारण्याचे काम झाले आहे, हेच कार्य आपणही पुढे सुरु ठेवले पाहिजे, असे सांगितले.
      याप्रसंगी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक शाम नळकांडे, बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे, संजय शेंडगे, दत्ता कावरे, अमोल येवले, दत्ता जाधव,आशा निंबाळकर, अरुणा गोयल, गिरिष जाधव आदि उपस्थित होते. संग्राम कोतकर, संतोष गेनप्पा, काका शेळके, परेश लोखंडे, शरद कोके, रमेश परतानी, अशोक दहिफळे, संदिप दातरंगे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment