सरकारचा पगार घेता मग सरकारचे काम करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, November 25, 2020

सरकारचा पगार घेता मग सरकारचे काम करा

 सरकारचा पगार घेता मग सरकारचे काम करा

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शेलार यांनी सुनावले खडेबोल

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदयाचे नूतन तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी पदभार स्वीकारल्यापासून तहसील कार्यालयात तक्रारीचा पाऊस पडू लागला होता त्याचीही कुणकुण त्यांच्या कार्यकत्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते घनश्याम शेलार यांच्या कानावर पडताच त्यांनी अचानक तहसिल कार्यालयाची पाहणी केली असता त्यांना अनेक प्रकारच्या त्रुटी लक्षात आल्यावर त्यांनी तहसीलदार यांना पगार शासनाचे घेता मग कामही शासनाचे करा असे खडेबोल तहसीलदार यांना सुनावले आहेत.
श्रीगोंदा तहसील कार्यालय नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने वादाच्या भोवर्‍यात सापडत असून मोठ्या प्रमाणात तक्रारीचा पाऊस पडत आहे. त्यामध्ये पुरवठा विभाग,रेकार्ड रूम तसेच कुळ कायदा तसेच अनेक विभागाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असताना त्यावर तोडगा काढला पाहिजे मात्र तहसीलदार यांच्याकडून जनतेची मोठ्या प्रमाणात कामात दिरंगाई होत होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी अचानक श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयाची पाहणी केली असता त्यांना अनेक कर्मचारी गायब असल्याचे दिसले तसेच नायब तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार देखील कार्यालयात हजर नसल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी तहसीलदार यांना खडेबोल सुनावत पगार सरकारचा घेता तर तुमच्यासह तुमच्या सर्व कर्मचार्‍यांना सांगा कामही सरकारचे करा असे सुनावले त्यावेळी तहसीलदार पवार हे मात्र निशब्द राहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here