घोड नदीपात्रात अवैध वाळूउपसा करणार्‍या बोटीवर पोलिसांचा छापा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 20, 2020

घोड नदीपात्रात अवैध वाळूउपसा करणार्‍या बोटीवर पोलिसांचा छापा

 घोड नदीपात्रात अवैध वाळूउपसा करणार्‍या बोटीवर पोलिसांचा छापा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यात राजापूर , कोल्हेवाडी शिवारात घोड नदी पात्रात अवैध वाळू उपसा करण्याच्या तयारीत असलेल्या यांत्रिक बोटीवर बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सहकार्‍यांसह छापा टाकत 9 लाख 50 हजार रुपयांची बोट जप्त करून दोघांविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद माने यांना खबर्‍यामार्फत तालुक्यातील कोल्हेवाडी, राजापूर शिवारात यांत्रिक बोटीच्या सह्यायाने अवैध वाळू उपसा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. माहिती नुसार पाहणी केली असता माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक माने यांनी पोलीस पथक घेऊन पाहणी केली असता यांत्रिक बोटीच्या सह्यायाने अवैध वाळू उपसा करण्याच्या तयारीत असलेले दिसून आले त्यानूसार छापा टाकून 9 लाख 50 हजार रुपयांची बोट जप्त केली. सदर बोटीचा पंचनामा करून बोट मालक गोरख बबन पाचर्णे व अनोळखी बोट चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment