नगर-वासुंदे फाटा रस्त्याच्या कामासाठी लोणी व्यंकनाथ ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा
नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः नगर वासुंदे फाटा रस्त्यावरील लोणी व्यंकनाथ शिवारातील 2 किमी रस्त्यांचे काम अपूर्ण राहिलेले काम त्वरित सुरु करून पूर्ण करावे अन्यथा 27 नोव्हेंबर रोजी पारगाव फाटा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा सरपंच रामदास ठोंबरे व उपसरपंच मितेश नाहाटा यांनी दिला तहसीलदार प्रदीपकुमार पवार याना निवेदनाद्वारे दिला आहे.
नगर - वासुंदे फाटा या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लोणी व्यंकनाथ शिवारात दोन किमीचे काम रस्त्यांचे ठेकेदार अग्रवाल कंपनीने अपूर्ण ठेवले असून मागील महिन्यात खासदार सुजय विखे यांनी या रस्त्याच्या कामा बाबत आढावा बैठक घेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.मात्र तरीही लोणी व्यंकनाथ शिवारातील अपूर्ण काम पूर्ण करण्यास ठेकेदार कंपनीने कानाडोळा केला. या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून चालकांना वाहन चालविताना प्रचंड कसरत करावी लागत असून अनेक वाहनचालकांना अपघातात आपले जीव गमवावे लागले आहेत. रस्त्यावरून जाणार्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात उडणार्या धुळीने रस्त्याच्या दुतर्फा राहणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे हे काम त्वरित सुरू करून दुरुस्त करावा काम सुरू न झाल्यास 27 नोव्हेंबरला पारगाव फाटा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा सरपंच रामदास ठोंबरे व उपसरपंच मितेश नाहाटा यांनी घेतला आहे. या संदर्भात तहसीलदार प्रदीप पवार व पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव यांना निवेदन दिले आहे.
No comments:
Post a Comment