वांबोरी गावठाणमध्ये 5 ट्रान्सफार्मर बसवावेत ः भिटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, November 25, 2020

वांबोरी गावठाणमध्ये 5 ट्रान्सफार्मर बसवावेत ः भिटे

 वांबोरी गावठाणमध्ये 5 ट्रान्सफार्मर बसवावेत ः भिटे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः वांबोरी गावठाण येथील ट्रान्स्फार्मर  ओव्हरलोड असल्याने सदर  5 ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात  यावे अशी  मागणी  ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे  जि.प.माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी  केली.
वांबोरी शहरातील गावठाणचे पाच ट्रान्सफार्मर हे ओव्हरलोड असल्यामुळे विज जाण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे वांबोरी गावातील व्यवसायिक, घरगुती ग्राहक,औद्योगिक ग्राहक त्रस्त झाले आहे म्हणून वांबोरी गावातील 1)अर्चना डी.पी 2)रामदेवबाबा डीपी 3)पारख डीपी 4)बाजारतळ डी.पी5)देहरेवेस डी.पी
या नवीन ट्रान्सफॉर्मरचा लोड कमी होण्यासाठी नवीन ट्रांसफार्मर मिळावे याची मागणी करताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे,माजी  सरपंच  नितीन  बाफना  माजी  सरपंच  किसन  जवरे पोपटराव  देवकर  कान्हू  मोरे  बंटी  मोरे  संकेत पाटील, पांडु मोरे, विकास दगलवाज,लक्ष्मण कुसळकर,रवि पटारे, सचिन पटारे,सचिन साळुंके, आदी युवक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here