वांबोरी-नगर रस्त्याचे काम लवकरच मार्गी ः तनपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 25, 2020

वांबोरी-नगर रस्त्याचे काम लवकरच मार्गी ः तनपुरे

 वांबोरी-नगर रस्त्याचे काम  लवकरच मार्गी ः तनपुरे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः वांबोरीकरांचे दृष्टीने  अतिशय  महत्वाचा असलेल्या  वांबोरी-नगर  या  रस्त्याचे काम  लवकरात  लवकर  मार्गी  लावले  जाईल  त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात या   रस्त्याच्या कामासाठी तरतूद करण्यात  येईल, असे  आश्वासन  ऊर्जा  राज्यमंत्री प्राजक्त  तनपुरे  ह्यांनी  दिले.
नामदार  तनपुरे हे  वांबोरी  येथील  पोटे  वस्ती  येथे  श्री  तनपुरे  ह्यांच्या विशेष  निधीतून  25 लाख  रुपये  खर्चाच्या  रस्त्याचे  खडीकरण व मजबुतीकरण  कामाचा  शुभारंभ  प्रसंगी  बोलत  होते. कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी  जिल्हा  परिषदेचे  माजी  अध्यक्ष  बाबा  भिटे  होते.  यावेळी  माजी  सरपंच  नितीन बाफना  माजी  सरपंच  किसन जवरे पोपटराव  देवकर  बंटी  मोरे कान्हू मोरे गोरख  वेताळ  आदि  प्रमुख  उपस्थित  होते
श्री  तनपुरे  आपल्या  भाषणात  म्हणाले की कोरोना महामारी मुळे राज्याचे व देशाचे आर्थिक गणित बिघडले आहे. विकासकामांचा निधी कमी कमी होत गेल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत,  तरीही रस्त्यांसह इतर विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत जी कामे मार्गी लागली दर्जेदार व्हावे अन्यथा अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाईल असा इशारा राज्याचे राज्यमंत्री नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी दिला.
वांबोरी गावावर व पंचक्रोशी वर माझे विशेष प्रेम असून जास्तीत जास्त निधी विकास कामांसाठी या गावाला देण्याचा प्रयत्न सुरू आहे असेही त्यांनी सांगितले.
श्री  तनपुरे म्हणाले की वांबोरी  परिसरातील  व गावातील  शेतकर्‍यांची  दिवसा  वीज  देण्याची  मागणी आहे.त्या बाबत  शासनाचे  नवीन  कृषी  विषयक  धोरणात  याबाबत निर्णय  घेण्यात  येणार  असून  वांबोरी  गटातील  खडांबे  येथे  वीज  उपकेंद्राचे काम  सुरु करण्यात  येणार  आहे.
जिल्हा  परिषदेचे  माजी  अध्यक्ष  बाबासाहेब  भिटे ह्यांनी पोटे  वस्ती  येथील  नागरिकांना  गेल्या  6महिन्या पासून  पिण्यासाठी  पाणीहि मिळत  नसून या  भागातील  नागरिकांनी  वास्तविक पाणी  पट्टी  आगाऊ  भरलेली  आहे. केवळ  राजकीय  दबावामुळे  हे  काम  होत  नसल्याचा  आरोप  श्री  भिटे  ह्यांनी  केला. 15 व्या  वित्त आयोगाचे  निधीतून  सदर  वस्तीस  8ते 15 दिवसात  पाणी  देण्याबाबत  ग्रामसेवक प्रशासक ह्यांना सूचना  कराव्यात.  वांबोरी चारीचे फेज टू मधून पोटे वस्ती भागातील तलावाला पाणी देण्यासाठी नियोजन करण्याची मागणी  केली.यावेळी ठाणगे सर रहाणे सर  तहसीलदार फसलोद्दीन शेख जलसंपदा विभागाच्या सायली पाटीलगट  विकास  अधिकारी  गोविंद  खामकर  सहाय्य्क  गट  विकास  अधिकारी  अनंत परदेशी महावितरणचे  धीरज  गायकवाड  अभियंता  भोर उपअभियंता  भणगे बांधकाम  विभागाचे  पाटीलग्रामविस्तार  अधिकारी  बी के  गागरे आकाश  पोटे  शेखर  पोटे  बन्सी पोटे निवृत्ती  पोटे सचिन  जाधव  सचिन  दुधाडे किरण  पोटे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ह्यावेळी  हृषीकेश  मोरे  ह्यांनी  सूत्रसंचालन व आभार  मानले.

No comments:

Post a Comment