कोरोना महामारीत दिलेल्या योगदानाबद्दल आ. लंके यांचा गौरवपत्र देऊन सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 25, 2020

कोरोना महामारीत दिलेल्या योगदानाबद्दल आ. लंके यांचा गौरवपत्र देऊन सन्मान

 कोरोना महामारीत दिलेल्या योगदानाबद्दल आ. लंके यांचा गौरवपत्र देऊन सन्मान

नवी मुंबईच्या सामाजिक संस्थेने घेतली आ. लंकेंच्या कार्याची दखल !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुवर्णाताई हाडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुवर्ण महिला विकास सेवा संस्था व बालकल्याण विकास संस्थेच्या माध्यमातून आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.या पूर्वीही नवी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी या महिला संस्थेच्या माध्यमातून कोविड या जागतिक महामारीत योगदान देणार्‍या अनेक कोरोना योद्ध्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली आहे .
पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी या जैविक युद्धात केलेल्या उल्लेखनीय कामांची दखल महाराष्ट्र तसेच देशपातळीवरील अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील पक्षनेतृत्वाने घेऊन त्यांना यापूर्वीही सन्मानित केलेले आहे.त्यांचे सार्वभौम सामाजिक कार्य पाहून देशाचे नेते राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांनी आमदार लंके यांनी कोरोना बाधित रुग्णांना वैद्यकीय मदत करण्यासाठी व गोरगरीब रुग्णांची दवाखान्यात होणारा अनाठाई खर्च वाचविण्यासाठी, शरद पवार यांचे नावाने शरदचंद्रजी पवार कोविड केअर चालू करून आज पर्यंत किमान अडीच हजार रुग्णांना सर्व सुख सुविधा जेवण व औषध उपचार मोफत देऊन त्यांना बरे करून घरी पाठविले आहे या कोविड सेंटरच्या महाराष्ट्रात अनोख्या पद्धतीने राबवलेल्या उल्लेखनीय आरोग्य मंदिराच्या माध्यमातून दिलेल्या सेवेबद्दल कौतुकाची थाप म्हणून म्बुलन्स भेट म्हणून दिली आहे .
लॉकडाउन चालू झाल्यापासून परप्रांतीय बांधव शेतमजूर कामगार परजिल्ह्यातील हजारो नागरिक यांना माझे परखे हा भेदभाव न करता ते त्यांच्या मतदार संघातील नसतानाही लाखो परप्रांतीय व परजिल्ह्यातील बांधवांना अन्न वस्त्र निवारा व अनवाणी चालणार्‍यांना चप्पल देत,तसेच अनेक ठिकाणी मास्क,सॅनिटायझर, भाजीपाला व स्वतः पाठीवर फवारणी पंप घेऊन तसेच ट्रॅक्टरद्वारे फवारणी करत निर्जंतुकीकरण करण्यात महत्त्वाचा सहभाग नोंदवणारे तसेच कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावोगावी जात जनजागृती करत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी पैकी एक वेगळेपण निर्माण करणारे आमदार निलेश लंके यांच्या कामाची दखल घेत सुवर्ण महिला विकास सेवा संस्था नेरूळ (नवी मुंबई ) येथील समाजसेविका सौ. सुवर्णाताई हाडोळे व त्यांच्या महीला सहकार्‍यांनी पारनेर येथील आमदार निलेश लंके जनसंपर्क कार्यालयात येऊन आमदार लंके यांना सन्मानित केले
यावेळी अहमदनगर येथील कुमारी स्नेहा प्रशांत जाधव हिने शैक्षणिक क्षेत्रात आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर व कुठलेही खाजगी क्लास न घेता शालांत परीक्षेत जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कु. स्नेहाचा सुवर्णा महिला विकास संस्थेचे सदस्यांच्या उपस्थितीत व आमदार लंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment