शासनाच्या योजना कागदावरच, प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही ः हजारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 20, 2020

शासनाच्या योजना कागदावरच, प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही ः हजारे

 शासनाच्या योजना कागदावरच, प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही ः हजारे

शिव पाणंदसोबत प्लॅस्टिक पेपर अस्तरीकरणाचा प्रयोग राबविण्यासाठी पवळे आंदोलन करणार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील पारनेर तालुका देशात नवनवीन चळवळी उभारुन देशसवेसाठी आग्रभागी राहीला असुन समाजसेवेचे नवे रोपटे याच तालुक्यात नव्याने वाढु लागुले आहे पारनेर तालुक्यातच नव्हे तर सपुर्ण शेतकरी वर्ग पाण्याइतकाच रस्त्यासाठी संघर्ष करत असुन गावोगावचे शिवपाणंद रस्ते खुले झाल्यास शेतकर्यांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न मिटेल व शेतकर्यांची अनेक भांडणे प्रशासणाच्या नाकर्तेपणामुळे आज कोर्टात चालु आहेत यासाठीच पारनेर तालुक्यात शेतकर्यांनी एकत्र येत पारनेर तहसिलवर वेगवेगळी आंदोलने करुन प्रशासणाचे लक्ष वेधले असुन याला व्यापकता देण्याचे काव पुन्हा नव्याने शिव पाणंद रस्ते नवनिर्माणकृती समितीच्या माध्यमातुन  चालु आहे त्याचबरोबर जेष्ठ समाजसेव आण्णासाहेब हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे पाझर तलाव,बंधारे यांची होणारी पाण्याची गळती थांबवण्यासाठी प्लॅस्टीक पेपर अस्तरिकरणाचा प्रयोग गावात राबवला याचा मोठा फायदा राळेगणसिद्धि परिवाराला झाला असुन असा कमी खर्चाचा प्रयोग सरकारने राज्यात राबवा म्हणुनच महाराष्ट्रात शेतकरी शेतरस्ते संघर्ष मुक्ती व पाणीदार महाराष्ट्र जनजागृती अभियान अभियान राबवुन राज्यात आवाज दो जनआंदोलनाचा लढा उभा करण्यासाठी जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब यांना जनजागृतीचे पहीले पत्रक देत आण्णांचे मार्गदर्शन घेवुन आवाज दो आंदोलनाचा शुभारंभ   राळेगणसिद्धि येथुन करण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी सांगितले.

शेतकरी शेतरस्ते मुक्ती व पाणीदार महाराष्ट्र जनजागृती करुन राज्यात आवाज दो आंदोलन उभे करुन गावागावातील शेतकर्यांचे शेतरस्ते खुले व्हावेत व पाझर तलाव,बंधारे यांची होणारी गळती थांबवण्यासाठी प्लॅस्टिक पेपर आस्तरणीकरचा कमी खर्चाचा प्रयोग गावोगावी राबवल्यास दुष्काळाची समस्या मिटेल व शेतकर्‍यांचा पाण्याचा प्रश्न मिटेल.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here