गाजदीपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे दाते यांच्या हस्ते भूमिपूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, November 25, 2020

गाजदीपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे दाते यांच्या हस्ते भूमिपूजन

 गाजदीपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे दाते यांच्या हस्ते भूमिपूजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः वडगाव सावताळ  येथील गाजदीपुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन शाळा खोली इमारत बांधकाम करणे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सभापती काशिनाथ दाते सर म्हणाले की गाजदीपुर या दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता सातवीपर्यंत शाळा आहे परंतु येथे खोल्यांची अपूर्तता होती साधारण सहा महिन्यापूर्वी येथील ग्रामस्थांनी माझ्याकडे एक नवीन इमारत खोली बांधकाम करण्याची मागणी केली होती. त्या मागणी प्रमाणे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषद अहमदनगर नवीन शाळा खोली रुपये 8.75  लाख निधीची तरतूद केली व त्याची आज प्रत्यक्षात भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी आणखी एक नवीन इमारतीची मागणी केली असून ती खोली पुढील आर्थिक वर्षात मंजूर करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते सर यांनी दिले तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हँडवॉश देण्याचे आश्वासनही सभापती दाते यांनी कबूल केले यावेळी सेवा सोसायटी चेअरमन सर्जेराव रोकडे, शिवसेना विभाग प्रमुख अंकुश ढेकळे, दादाभाऊ न-हे, माजी ग्रा. सदस्य संपत वाणी,  मनोहर सातकर , सुभाष करगळ, भाऊसाहेब सातकर, किरण काळे ,रामदास सातकर, रावसाहेब कोळेकर, धनेश करगळ ,खंडू कोळेकर ,शाळेचे मुख्याध्यापक बर्वे सर ,अडसूळ सर ,सोनवणे सर ,विष्णू करगळ, पावसा करगळ,  चंद्रकांत झिटे, तुकाराम झिटे ,शाखा अभियंता शिवाजी महांडुळे, ग्रामसेवक लोंढे भाऊसाहेब, आणि कामाचे ठेकेदार संचित वाळुंज उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here