शिवराज प्रतिष्ठानतर्फे कडूसमध्ये मिठाई वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, November 21, 2020

शिवराज प्रतिष्ठानतर्फे कडूसमध्ये मिठाई वाटप

 शिवराज प्रतिष्ठानतर्फे कडूसमध्ये मिठाई वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील कडूस येथील सर्व गावकर्यांना दिपावली  निमित्त शिवराज प्रतिष्ठान  तर्फे मनोजदादा मुगंसे  यांच्या मार्गदर्शनाखाली मिठाईचे वाटप करण्यायात आले.गावात शिवराज प्रतिष्ठान मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तसेच दिवाळीनिमित्त गोरगरिबांना मिठाईचे वाटप यासह विविध समाजोपयोगी  उपक्रम राबवले जातात.
चालू वर्षी कोरोना महामारीमुळे नऊ महिन्यांपासून सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम मिळाले नाही.अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे होत्याचे नव्हते झाले.अशा परीस्थित ग्रामस्थांना शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने मदतीचा हात दिल्याने कडूसमधील ग्रामस्थांची दिवाळी गोड झाली आहे.
यावेळी  दादासाहेब मुंगसे,गणेश रावडे यांच्या वतीने मिठाई वाटप करणयात आले. मिठाई वाटपासाठी गावातील युवा नेते सुहास नरवडे, संतोष करंजुले,सतीष डवणे, बापू नरवडे, महेश मुगंसे, संकेत दिवटे, अमोल दिवटे, संतोषशेठ दिवटे, मयूर रावडे, सतिष रावडे, दत्ता शिंदे,संतोष नरवडे, सचिन रावडे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here