राजेश्वरी कोठावळे यांना ’कोरोना योद्धा’ पुरस्कार ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 20, 2020

राजेश्वरी कोठावळे यांना ’कोरोना योद्धा’ पुरस्कार !

 राजेश्वरी कोठावळे यांना ’कोरोना योद्धा’ पुरस्कार !

कोरोना काळातील कामाचा पारनेर तालुका बलुतेदार संघटनेने केला गौरव


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यात महिला सक्षमीकरणासाठी काम करणार्‍या किकबॉक्सिंगच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक असलेल्या कु. राजेश्वरी कोठावळे यांनी कोरोना काळामध्ये कोरोना रुग्णांसाठी उत्तम कार्य केले आहे. त्यांनी पारनेर येथील कोविड सेंटर आणि टाकळी ढोकेश्वर येथील कोविड सेंटरमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी तेथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना योगाद्वारे प्रशिक्षण दिले आहे. व कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांमध्ये त्यांनी उत्साहवर्धक वातावरण तयार करून एक प्रकारे कोरोना रुग्णांची सेवा केली. त्यांनी केलेले ही सेवा नक्कीच समाजाला प्रेरणा देणारी आहे. कोरोना काळात त्यांनी केलेले हे काम निश्चितच योग्य आहे.  राजेश्वरी कोठावळे या खर्‍या अर्थाने कोरोना योद्धा म्हणून समाजात पुढे आल्या आहेत  त्यामुळे पारनेर तालुक्यातील बलुतेदार संघटनेच्या वतीने त्यांचा ’कोरोना योद्धा’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी  राजेंद्र करंदीकर, मोहन रोकडे, अमित जाधव, सचिन भोजणे, जेष्ठ पत्रकार संजय मोरे, गोफणे सर, आनंदा झेरेकर, संतोष खामकर शिक्षण नेते संतोष पवार, बाळासाहेब शिरतार, गंगाधर कोळेकर, रविंद्र साळवे, राम दुधाडे, बाळु माकरे, गेणभाऊ माळी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment