पारनेर पब्लिक स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 20, 2020

पारनेर पब्लिक स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

 पारनेर पब्लिक स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व प्राथमिक इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत पारनेर पब्लिक स्कूलचे 37 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. यातील एका विद्यार्थीनीने राज्य गुणवत्ता यादीत आपले नाव झळकावले असे प्राचार्य श्री.गीतारामजी म्हस्के यांनी सांगितले.
शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पारनेर पब्लिक स्कूलने बाजी मारली. 37 विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश झाला असून इयत्ता आठवीमधील सिद्धी भालेकर हीने राज्यात 16वा तर जिल्ह्यात 8वा क्रमांक प्राप्त केला आहे.
इयत्ता पाचवीमधील 10 तर आठवीमधील 27 विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश झाला असून पाचवीत विराज कदम (226) गौरव ठुबे (218) चिनार ठुबे (216) ऋचा औटी (216) स्वराज निमसे (212) अक्षदा औटी (210) अनुष्का चौधरी (206) तन्वी औटी (204) अद्वैत जाधव (202)  पार्थ औटी (202) तर आठवीत सिद्धी भालेकर (268) विराज पठारे (264) निर्मय ठुबे (264) रिद्धी रेपाळे (256) आदित्य ठोकळ (250) यश खोसे (250) श्वेता सोनवणे (246) श्रावणी गट (246) यश बनकर (244) यश शिंदे (244) ऋतुजा औटी (238) लोकेश सोबले (234) प्रणव कांडेकर (226) अथर्व शिंदे (224) साई मंडलिक (222)अदिती ठाणगे (218) मृणाली झावरे (214) आदित्य नाईक (214) मितुल गांधी (212) श्रद्धा ठुबे (210) सुयश जाधव (210) प्रशंसा दोडके (210) ओम पठारे (210) सुजल मुंगसे (210) शर्वरी पवार (208) मनस्वी थोरात (208) कल्याणी गाडेकर (208) याप्रमाणे गुण प्राप्त केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सचिन मोढवे, महादेव रणदिवे, नागेश शेकडे, नवनाथ गिते, शंभू भालेकर, अजिनाथ नांगरे, दत्तात्रय काकडे  प्राचार्य श्री.गिताराम म्हस्के यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण श्री.डॉ.अण्णासाहेब हजारे, डांगे पॅटर्नचे संस्थापक श्री. इंद्रभानजी डांगे, संस्थेच्या अध्यक्षा सौ. सविता म्हस्के, विद्यालयाचे प्राचार्य श्री. गितारामजी म्हस्के, यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here