पारनेर सैनिक बँकेच्या व्ह्या.चेअरमन पदी शिवाजी सुकाळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 27, 2020

पारनेर सैनिक बँकेच्या व्ह्या.चेअरमन पदी शिवाजी सुकाळे

 पारनेर सैनिक बँकेच्या व्ह्या.चेअरमन पदी शिवाजी सुकाळेनगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी वडनेर बुद्रुक तालुका पारनेर येथील सेवा संस्थेचे माजी चेअरमन व सेनापती बापट पतसंस्थेचे माजी संचालक श्री शिवाजी बाबुराव सुकाळे यांची बिनविरोध निवड झाली .मावळते व्हा. चेअरमन नामदेव काळे यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती त्यानुसार गुरुवार दिनांक २६/११/२०२० रोजी एक वाजता सहाय्यक निबंधक पारनेर श्री एस.डी. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी सुकाले यांची निवड जाहीर करण्यात आली
श्री शिवाजी बाबुराव सूकाळे यांचा व्हा.चेअरमन पदासाठी एकच अर्ज असल्याने त्यांच्या नावाची सूचना  संचालक श्री संजय तरटे यांनी केली तर संचालक श्री श्रीकांत तोरडमल यांनी अनुमोदन केले त्यानुसार बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यवंशी यांनी अधिकृत जाहीर केले. बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे म्हणाले,पारनेर तालुका सहकारी बँकेच्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा ,कर्जत, जामखेड अशा एकूण चार शाखा असून  कर्जवाटप नव्वद कोटीचे आहे. उपाध्यक्ष सुकाळे म्हणाले बँकेचा नावलौकिक मोठा असून हा लौकिक कायम राहण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. यावेळी संचालक नामदेव काळे, संजय तरटे, संतोष गांधडे, भिमाजी साठे, श्रीकांत तोरडमल श्री दत्तात्रेय साले पाटील भास्कर पोपळघट व शांताबाई मापारी सुनिता तरटे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रोकडे उपस्थित होते. उपाध्यक्ष सुकाळे यांनी अध्यक्ष शिवाजीराव व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला.
फोटो ओळी
बँकेच्या उपाध्यक्षपदी शिवाजी सुकाळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करताना सहाय्यक निबंधक श्री एस. डी. सूर्यवंशी यांच्यासह अध्यक्ष शिवाजीराव व्यवहारे माजी उपाध्यक्ष नामदेव काळे व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांचे सह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here