ओल्या पार्ट्या देणार्‍यांनाच औद्योगिक वसाहतीत ठेका ः देसाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 25, 2020

ओल्या पार्ट्या देणार्‍यांनाच औद्योगिक वसाहतीत ठेका ः देसाई

 ओल्या पार्ट्या देणार्‍यांनाच औद्योगिक वसाहतीत ठेका ः  देसाई

सुपा येथील उपोषणाचा तिसरा दिवस... वाढता पाठिंबा... मात्र प्रशासन सुस्तच...


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने विकसित होत असलेल्या या परिसरात वाघुंडे, आपधुप, बाबुर्डी, पळवे आधी शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत. औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यामागे त्याचा मुख्य उद्देश स्थानिकांची आर्थिक उन्नती करणे हा आहे. तेथील स्थानिकांची आर्थिक, शैक्षणिक, आरोग्याची उन्नती व्हावी हा त्यामागील हेतू असतो. त्यांचे राहणीमान सुधारावे त्यांना सुखी-समाधानी आयुष्य जगता यावे यासाठी शेतकर्‍यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जातात. तेथील विकास कामावर स्थानिकांचा अधिकार असतो परंतु दुर्दैवाने भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणा, भ्रष्ट राजकीय यंत्रणा, औद्योगिक क्षेत्रातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी स्थानिकांचा अधिकार गमावतात, मात्र ओल्या पार्ट्या देणार्‍यांना लेबर कॉन्ट्रॅक्ट, बांधकामाचे ठेके, साहित्य पुरवण्याचे कामे दिली जातात असा आरोप धनंजय देसाई यांनी केला आहे.

पारनेर तालुक्यातील सुपा परीसरातील म्हसणे फाटा येथील नव्याने सुरू झालेल्या मायडीया व कॅरीअर कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्त व स्थानिक भुमिपुत्रांना नोक-या तसेच कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या मागणासाठी वाघुुंडे येथील चार तरूणांनी सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून अमरण उपोषण सुरू केले आहे.हे उपोषण तिसर्‍या दिवशी सुरूच होते.
दरम्यान विविध संघटनांनी उपोषण स्थळी जाऊन जाहीर पाठिंबा दर्शविला यामध्ये हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेऊन पाठींबा दर्शविला व प्रकल्पग्रस्थांची भेट घेतली.तसेच सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, पारनेर तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे आदींनी उपोषणस्थळी येऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.मात्र प्रकल्पग्रस्थांच्या न्याय हक्कासाठी प्रशासन उदासीन असल्याचे दिसून आले.
म्हसणे फाटा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये मायडीया व कॅरीअर या दोन कंपन्या प्रत्यक्ष सुरू झाल्या असून तेथे ज्यांच्या जमीनी गेल्या, त्यांच्या तरूणांना नोक-या तसेच कॉन्ट्रॅक्ट देण्यात यावे अशी मागणी तरूण गेल्या वर्षभरापासून करीत आहेत. यापूर्वी आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर मार्ग काढण्याचे अश्वासन देण्यात आले, मात्र तरूणांच्या हाती काहीही पडले नाही. या कंपन्यांमध्ये सर्व कॉन्ट्रक्ट पुणे येथील ठेकेदारांना देण्यात आले असून नोक-यांमध्येही बाहेरच्याच तरूणांना घेण्यात आले आले असल्याचा आरोप उपोषणकर्ते यांनी केला आहे.
उपोषण सुरू झाल्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. तुमचे आंदोलनच बेकायदेशीर आहे. तुमच्यावर गुन्हे दाखल करू, कंपनीवर दगडफेक केल्याचे गुन्हे दाखल करू अशा प्रकारची भिती घालण्यात आली. मात्र त्यास आंदोलकांनी जुमानले नाही. मंगळवारी दुपारी तहसिलदार ज्योती देवरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. मायडीया, कॅरिअरचे प्रोजेक्ट हेड यादव हे देखील तेथे उपस्थित होते. कंपनीमध्ये 80 टक्के स्थाकिन तरूणांना संधी देण्यात आल्याचा दावा यादव यांनी केला. स्थानिक याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रातील तरूण जो तेथे वास्तव्यास आहे असा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे. या कंपन्यांमध्ये स्थानिकांना कॉट्रॅक्ट देण्याचे काहीच कारण नाही असे ठामपणे सांगत यादव यांनी पुण्याच्या ठेकेदारांचीच तळी उचलली. आमच्या जमीनी घेतल्या. त्यावर उभ्या राहिलेल्या कंपन्यांमधील एखादे तरी कॉक्ट्रॅक्ट आम्हला मिळावे अशी माफत अपेक्षा या तरूणांची आहे. परंतू कंपनी व्यवस्थापन प्रशासनास हाताशी धरून तरूणांचे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून तिसर्‍या दिवशी उपोषण सुरूच ठेवण्यात आले आहे.दुसर्या व तिसर्‍या दिवशी प्रशासकीय अधिकार्यांनी उपोषणकर्ते यांच्याकडे पाठ फिरवली.
या आंदोलनात अविनाश गाडीलकर, अशोक गाडीलकर, विनायक रासकर, प्रमोद गाडीलकर, संतोष गाडीलकर हे सहभागी झाले आहे.

No comments:

Post a Comment