बोरमळी घाट रस्त्याचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, November 23, 2020

बोरमळी घाट रस्त्याचा शुभारंभ

 बोरमळी घाट रस्त्याचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर येथील काळेवाडी ते बोरमळी या घाट रस्त्याचे कामाचे शुभारंभ जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सभापती काशिनाथ दाते सर म्हणाले की काळेवाडी येथील ग्रामस्थांची हा घाट रस्ता करण्याची मागणी होती त्यानुसार हा रस्ता पाहिल्यानंतर हा रस्ता डोंगरपोटांनी खाली बोरमळी येथे टेकडवाडी ला जाणार्‍या डांबरी रस्त्यात सोडवायचा होता. काळेवाडी च्या शेतकर्‍यांच्या पाईपलाईन नदीवरून वरती घाटाने गेलेले आहेत त्यामुळे त्यांना शेतीकामासाठी सारखे खाली घाटाने उतरावे लागत होते. अतिशय खडतर घाटाने महिला व लहान मुले खाली उतरतात हे पाहून जिल्हा परिषदेच्या  निधीची तरतूद करून हा रस्ता करून देण्याचे ठरवले व त्याचे आज प्रत्यक्षात कामाचा शुभारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांच्यासमवेत सुरू केला.

तसेच हा रस्ता झाल्यावर येथील शेतकर्‍यांची पाच किलोमीटरवर देसवडे गावातुन किंवा टेकडवाडी घाटाने जाऊन यावे लागत होते तो त्रास होणार नाही त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी व महिलांनी सभापती काशिनाथ दाते सर यांचे अभिनंदन व उत्साहात स्वागत केले आहे. यावेळी सभापती यांनी काळेवाडी ते टेकडवाडी हा घाट रस्ताही दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी मनोगत व्यक्त करताना काळेवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब कारभारी टेकुडे यांनी सांगितले की हा घाट रस्ता आम्हा शेतकर्‍यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आमच्या सर्व जमिनी पठारावरती असून पाईपलाईन सर्व नदीवरून आहेत आम्हाला खाली विहिरीकडे किंवा वीजपंप कडे येण्यासाठी ह्या घाटाने खाली उतरावे लागत होते किंवा देसवडे किंवा टेकड वाडी असे पाच किलोमीटर अंतर जाऊन यावे लागत होते हा रस्ता झाल्यास दहाच मिनिटात आम्ही नदीवर पोहोचू शकतो यामुळे आम्हा सर्व शेतकर्यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते सर यांचे आभारी आहोत. यावेळी देसवडे गावचे उपसरपंच बबनराव शिंदे, भाऊसाहेब टेकुडे, ह भ प शिवाजी दाते ,प्राध्यापक किशोर टेकुडे ,संपत तोडकर ,शिवाजी गुंड ,बबन गुंड, गोविंद औटी, पांडुरंग गुंड, बंडू औटी, दीपक गुंड ,सूर्यभान दाते, तुकाराम दाते, प्रकाश टेकुडे ,धोंडीभाऊ दाते, शिवाजी तोडकर, ज्ञानदेव दाते, अमोल गुंड ,रमेश दाते, दत्ता फटांगरे ,ग्रामसेवक सांगळे भाऊसाहेब ,रोहिदास दाते, प्रदीप गुंड, रामभाऊ गुंड, राजेंद्र गुंड, कृष्णा दाते ,गंगाराम टेकुडे, शाकाहारी दाते ,सुभाष दाते, शिवनाथ दाते ,देवराम औटी, इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच बबनराव शिंदे यांनी केले तर आभार भाऊसाहेब कारभारी टेकवडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here