आमदार निलेश लंकेच्या प्रमुख उपस्थितीत कोविड युद्ध दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 20, 2020

आमदार निलेश लंकेच्या प्रमुख उपस्थितीत कोविड युद्ध दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

आमदार निलेश लंकेच्या प्रमुख उपस्थितीत कोविड युद्ध दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

निलेश लंके प्रतिष्ठान चे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लावली हजेरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः इमेज क्रियेशनच्या कोविड युध्द या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन पारनेर नगरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते पारनेर येथे गुरुवारी संपन्न झाले. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. 

 कोरोना विरोधात आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, व्यक्ती व अधिकाऱ्यांनी जो लढा दिला त्यावर हा विशेषांक करण्यात आला असून पत्रकार नाना करंजुले यांनी संपादित केला आहे.
कोरोना या वैश्विक संकटात सर्व जनजीवनापासून यंत्रणा कोलमडली. कोरोनाविषाणू चे संक्रमण होणे म्हणून टाळेबंदी करावी लागेल. त्यादरम्यान हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. अनेक जण अडकून पडले. या आरोग्य आणीबाणीच्या काळात लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, शासकीय यंत्रणा, वेगवेगळे सेवाभावी व्यक्ती, डॉक्टर, परिचारिका, पोलीस पुढे आले. त्यांनी गरीब गरजूंना मदतीचा हात दिला. प्रतिकूल परिस्थितीतही या सर्वांनी अनुकूल काम केले. कोरोना विरोध संघटित लढा दिला. या संकटात माणुसकी कामी आली, सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता, आपलेपणाची भावना जागृत झाली. या सर्व पार्श्वभूमीवर एक सकारात्मक विचार घेऊन 'कोविड युद्ध' दिवाळी विशेषांक पत्रकार नाना करंजुले यांनी संपादित केला. त्यामुळे पनवेल, रायगड, पारनेर, ठाणे याशिवाय इतर परिसरात जे कोरोना विधायक कामे केली गेली त्यांना  स्पर्श करण्याचे प्रयत्न करण्यात आला आहे. पारनेर नगरचे आमदार निलेश लंके यांनी या काळात लोकप्रतिनिधित्वाचा खऱ्या अर्थाने ठसा उमटवला. त्याशिवाय इतरांनीही स्वतःला झोकून देऊन कोरोनाचा प्रतिकार केला. याचेही वर्णन कोविड युध्द या अंकात करण्यात आले आहे.  पारनेर येथील जनसंपर्क कार्यालय आ.लंके यांच्या  हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या विशेषांकाचे त्यांनी कौतुक करीत विधायक काम करणाऱ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल असे मत व्यक्त केले. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठान चे महाराष्ट्रभर प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, निघोजची सरपंच ठकाराम लंके, निलेश लंके प्रतिष्ठान चे मुंबई उपाध्यक्ष गोविंद साबळे, मुंबई संपर्कप्रमुख भाऊ पावडे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, प्रतिष्ठानचे प्रसारमाध्यम प्रमुख भाऊ चौरे, संदीप चौधरी, पोपट नवले , दादा दळवी, आरती ढोरमले  संभाजी वाळुंज, योगेश मापारी, अनिल कर्पे,  निलेश लंके प्रतिष्ठान चे अपंग सेल तालुका अध्यक्ष सुनील करंजुले, उद्योजक गणेश करंजुले, हिरामण बेलोटे, ताराचंद करंजुले, भास्कर करंजुले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here