जातेगावात जमिनीच्या वादातून दोन गटांत राडा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 21, 2020

जातेगावात जमिनीच्या वादातून दोन गटांत राडा

 जातेगावात जमिनीच्या वादातून दोन गटांत राडा

दोन जखमी, सहा जणांसह 17 जणांवर गुन्हा दाखल


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः अहमदनगर पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव हद्दीत हाँटेल कुणाच्या हद्दीत आहे या वादातुन जबर हणामारी झाली. यात दोन जण जखमी झाले असुन दोघांनीही सुपा पोलिस स्टेशनला परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या आहेत दोन्ही गटातील एकुन सहा व्यक्तींवर  गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या पहिल्या फिर्यादीत शुभम संतोष पोटघन रा.जातेगाव यांनी म्हटले आहे की,गुरुवार दि.19 नोव्हेंबर 2020  रोजी सांयकाळी 7.00 वाजता आम्ही आमचे नगर- पुणे महामार्गावरील हाँटेल जय मल्हार बंद करून घरी जात असताना आरोपी शांताराम पोटघन, ऋषीकेश पोटघन, सौरभ पोटघन, विठ्ठल पोटघन हे आमच्या जागेत माती उकरत होते  त्यांना माती उकरु नका असे म्हटल्याने त्याचा राग येवून लोखंडी पाईप, हाँकी स्टिक, काठीने व लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली यावेळी आमची आई सोडविण्यासाठी मध्ये आली आसता तिलाही मारहाण केली.
सुपा पोलिसांनी फिर्यादीच्या माहिती वरुन चौघां विरुध भा,द,वि.क,323.324.504.506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन सा.फौ.पठाण व पो. ना. आडकित्ते यांनी घटनास्थळी भेट दिली.
याच घटनेत शांताराम पोटघन यांनी सुपा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आमच्या शेतातील गट क्र .174 मध्ये टाकलेले हाँटेल साई मल्हार काढुन घ्या व आमची जागा मोकळी करा असे सांगितले म्हणून ओंकार संतोष पोटघन व संतोष सिताराम पोटघन व इतर 15 ते 17 अनोळखी इसम त्यांचे नाव व पत्ते माहीत नाही यांनी फायबरच्या दांडक्याने व लाथाबुक्याने मारहाण केली.
सुपा पोलिसांनी शांताराम पोटघन यांच्या फिर्यादीवरुन ओंकार पोटघन व संतोष पोटघन यांच्याविरुध्द भा. द. वि. कलम 145. 147. 148. 149. 324. 323. 504. 506  427 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सुपा पोलिसांनी दोन्ही बाजुचे म्हणने ऐकून दोन्ही बाजुच्या सहा व अनओळखी इतर 15 ते 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment