नायलॉन दोर्‍यात अडकलेल्या दुर्मिळ घुबडाला जीवनदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 21, 2020

नायलॉन दोर्‍यात अडकलेल्या दुर्मिळ घुबडाला जीवनदान

 नायलॉन दोर्‍यात अडकलेल्या दुर्मिळ घुबडाला जीवनदान

शिक्षक मच्छिंद्र साळवे व पक्षीमित्र ऋषिकेश, युवराज यांच्याकडून...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आज सावेडी स्टेट बँक जुन्या इमारतीच्या मागे बोरीच्या  काट्यात नायलॉनच्या दोरा मानेत व पायात पिसामध्ये गुंतल्याने घायाळ अवस्थेत मच्छिंद्र साळवे सर यांनी पाहिले व त्यांनी पक्षी मित्र लांडे रूषीकेश. युवराज नवले या पक्षी मित्रांना बोलावून जखमी दुर्मिळ अशा गव्हाणी घुबडाला पक्षीमित्रांच्या ऊपचारासाठी ताब्यात दिले.. त्याचा जीव वाचविला...या कामी पत्रकार नवनाथ खराडे, पक्षीमित्र संदिप फंड सर यांनीही सहकार्य केले.
काल  दुपारी तीनच्या दरम्यान शिक्षक मच्छिंद्र साळवे हे सावेडी स्टेट बँक जुन्या इमारती जवळून जात होते. त्याच वेळी तेथे बोरीच्या झाडाच्या काट्यात त्यांना एक पक्षी तडफडताना दिसला. त्याच्या भोवती कावळे घोळका घालून चोच मारण्याचा प्रयत्न करत होते, तर एक मांजर ही दबा धरून बसले होते. साळवे यांनी त्वरित या पक्षाकडे धाव घेतली. जवळ जाउन पाहिले तर ते घुबड होते. बोरीच्या काट्यात व पतंगाच्या नायलॉनच्या दोर्‍यात अडकल्याने ते जखमी झाले होते. साळवे यांनी त्वरित पक्षीमित्र संदिप फंड यांच्याशी संपर्क केला.परंतु ते बाहेरगावी असल्याने त्यांनी दुसरे पक्षी मित्र ऋषिकेश लांडे व युवराज नवले यांच्याशी संपर्क करण्याचे सांगितले. ते घटनास्थळी येईपर्यंत सुमारे दीड तास साळवे हे त्या झाडाजवळ थांबून होते.तेथे थांबून त्यांनी कावळे, मांजरांपासून त्या घुबडाचे संरक्षण केले.
साडेचारच्या सुमारास पक्षिमित्र लांडे व नवले घटनास्थळी दाखल झाले. त्या सर्वांनी त्या घुबडाला सुखरूप बाहेर काढले. काट्याने व दोर्‍यात अडकल्याने घुबड रक्तबंबाळ झाले होते. त्या घुबडाचे निरीक्षण केल्यानंतर ते दुर्मिळ जातीचे गव्हाणी घुबड असल्याचे पक्षी मित्रांनी सांगितले. त्याला औषधोपचारासाठी ताब्यात घेत पक्षी मित्र व साळवे तेथून रवाना झाले.

काही लोक भयानक व अशुभ  गव्हाणी दुर्मिळ घुबड पाहून निघून गेले .घुबडाचे तोंड पाहू नये .पाप लागेल असे मला म्हणाले.मी त्यांना हे घुबड दुर्मिळ जातीचे असुन शेतकर्‍यांचा मित्र आहे असे समजून सांगितले. अंधश्रद्धा सोडायला सांगितले.
- मच्छिंद्र साळवेे

No comments:

Post a Comment