शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात 26ला संप! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, November 23, 2020

शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात 26ला संप!

 शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात 26ला संप!

शहर जिल्हा हमालपंचायत अध्यक्ष अविनाश घुलेंचा निर्धार..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दहा केंद्रीय कामगार संघटना देश पातळीवरील विविध उद्योगांसाठी कामगार व कर्मचारी फेडरेशन तसेच 250 पेक्षा जास्त किसान संघटनेच्या वतीने केलं सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी म्हणजेच देश विरोधी धोरणांच्या विरोध करण्यासाठी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप असे आव्हान करण्यात आले असल्याची माहिती नगर जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
घुले म्हणाले की, कृषी कायदे व कामगार विरोधी चार सहिता रद्द करा अशी मागणी आहे किमान वेतन दरमहा एक हजार रुपये करा व संघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करून त्यांना आरोग्य विमा पेन्शन पीएफ इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करा पेट्रोल आणि डिझेल वरील केंद्रीय करा मध्ये कपात करून महागाई रोखा, आदिल सर आम्ही 25 हून अधिक मागण्या केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या आंदोलनामध्ये मार्केट कमिटी बरखास्त करण्याचा कायदा रद्द करावा माथाडी कामगारांना पेन्शन योजना लागू करावी माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी माथाडी कामगार या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत तसेच संसार कर्मचार्‍यांना किमान वेतन देण्यात यावे यासाठी पतसंस्था कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहेत असे ते म्हणाले. नगर शहरामध्ये एमआयडीसीमध्ये सरकारी कामगार हॉस्पिटल निर्माण झाली पाहिजे किमान वेतन मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे या देशव्यापी संपामध्ये सर्व कामगार संघटना सहभागी होणार असल्याचे वाकळे यांनी यावेळी सांगितले. या देशविरोधी धोरणाच्या विरुद्ध आंदोलनामध्ये राज्य सरकारी कर्मचारी औद्योगिक कामगार यांच्या बरोबरीने वेळी कामगार शेतमजूर सर्व समाज घटक सहभागी होणार आहेत असे कॉम्रेड सुभाष लांडे यांनी सांगितले. यावेळी एडवोकेट सुभाष लांडे एडवोकेट सुभाष टोकेकर बैजनाथ वाकळे आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here