आ. जगताप यांची ‘प्रहार’च्या वतीने सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 21, 2020

आ. जगताप यांची ‘प्रहार’च्या वतीने सत्कार

 आ. जगताप यांची ‘प्रहार’च्या वतीने सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरपंचायत राज्य समिती वर अहमदनगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांची निवड झाल्याबद्दल प्रहार दिव्यांग विभाग च्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी अहमदनगर महानगरपालिकेकडून दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी निर्वाह भत्ता म्हणून दिले जाणारे अनुदान जवळजवळ चौदा महिन्याचे थकित अनुदान देण्याचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी प्रहार च्या पदाधिकार्‍यांना आश्वासित केले. याप्रसंगी प्रहार जिल्हाध्यक्ष अँड. लक्ष्मणराव पोकळे , प्रहार जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पोपट शेळके, शहर उपाध्यक्ष संदेश रप्परिया आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment