समता परिषदेच्या कार्यास सहकार्य राहील-अशोक तुपेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 21, 2020

समता परिषदेच्या कार्यास सहकार्य राहील-अशोक तुपेश

 अंबादास गारुडकर व दत्ता जाधव यांचा सत्कार

समता परिषदेच्या कार्यास सहकार्य राहील-अशोक तुपेश


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विविध उपक्रमातून समाज जोडण्याचे काम सुरु आहे. या उपक्रमात समाजातील विविध स्तरातील महिला, युवक मोठ्या संख्येने जोडले जात आहे. नगर जिल्ह्यात समता परिषदेचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असून, पदाधिकारी राबवित असलेल्या उपक्रमांचा समाजातील विविध घटकांना फायदा होत आहे. निवड झालेले अंबादास गारुडकर व दत्ता जाधव यांनी नगर जिल्ह्यात समता परिषदेच्या कार्यात चांगले योगदान दिले आहे, त्यांचे कार्य यापुढेही असेच सुरु ठेवावे, त्यांच्या कार्यास आमचेही सहकार्य राहील, असे प्रतिपादन श्री संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे यांनी केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य सरचिटणीसपदी अंबादास गारुडकर व महानगर अध्यक्षपदी दत्ता जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि.प.सदस्य शरद झोडगे, जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, फुले ब्रिगेड शहराध्यक्ष दिपक खेडकर, डॉ.सुदर्शन गोरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, प्रा.संजय गारुडकर, अशोक कानडे, किरण जावळे, जालिंदर बोरुडे, निखिल शेलार, महेश गाडे, ब्रिजेश ताठे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी दत्ता जाधव म्हणाले, समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना.छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे नगरमध्ये चांगले काम सुरु आहे. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थीसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन करुन शैक्षणिक अडचणी सोडविल्या. श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने सत्कार करुन एकप्रकारे प्रोत्साहन देण्याचे काम केले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अंबादास गारुडकर म्हणाले, महात्मा ज्योतीबा व सावित्रीमाई फुले यांना भारतरत्न मिळावा तसेच फुले वाड्याचे स्मारकात रुपांतर करावे, यासाठी आंदोलनेही केली आहेत. आज फेर निवड करुन माझ्या कार्याची पावतीच मला मिळाली, असे सांगून यापुढे समता परिषदेचे काम आणखी जोमाने करु असे सांगून केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले.


No comments:

Post a Comment