हिवताप अधिकारी अँटिकरप्शनच्या जाळ्यात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 27, 2020

हिवताप अधिकारी अँटिकरप्शनच्या जाळ्यात.

 हिवताप अधिकारी अँटिकरप्शनच्या जाळ्यात.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः संगमनेर मधील 53 वर्षीय आरोग्यसहाय्यक यांचेकडून 80 हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या जिल्हाहिवताप अधिकारी डॉ. रजनी रामदास घुणे वय 57 रा. सिव्हिल हडको या काल अँटीकरप्शनच्या ट्रॅप मध्ये सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. लाचलुचपत विभागाच्या नगर कार्यालयात सापळा रचून त्यांना रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की   1 सप्टेंबर 2014 ते 16 जानेवारी 2015 दरम्यान आजारी पणाच्या रजेवर होते या दरम्यानच्या कालावधीत मधील वेतन त्यांना मिळाली नव्हते हे वेतन मिळावे. यासाठी तक्रारदार यांनी 2019 मध्ये जिल्हा हिवताप अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता त्यावर जिल्हा हिवताप अधिकारी खुणे यांनी सदर कालावधीमधील वेतन 1 लाख 39 हजार रुपये काढून तक्रारदार यांच्या बँक खात्यात 19 नोव्हेंबर 2020 रोजी जमा केले होती. वेतन काढण्याचे काम केले म्हणून डॉक्टर यांनी तक्रारदार यांच्याकडे 60% प्रमाणे 84 हजार रुपये रकमेची मागणी केली होती तक्रार यांनी लाचलुचपत विभागाच्या नगर कार्यालयात तक्रार दिली काल नगर शहरातील चितळे रोडवर यांच्याकडून 80 हजार रुपयांची लाच घेताना यांना रंगेहाथ पकडण्यात आले पोलिस उपाधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्याम प्रेम,दीपक करंडे यांच्या पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here