पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे विश्वमानव अधिकार परिषदेच्यावतीने स्वागत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, November 23, 2020

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे विश्वमानव अधिकार परिषदेच्यावतीने स्वागत

 पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे विश्वमानव अधिकार परिषदेच्यावतीने स्वागत


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या नूतन पोलीस निरीक्षकपदी अनिल कटके यांची नियुक्ती झाल्याबद्दल अहमदनगर येथील विश्वमानव अधिकार परिषदेच्यावतीने स्वागत करून त्यांचे गौरव करण्यात आला.
यावेळी विश्वमानव अधिकार परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक अध्यक्ष नवेद शेख, विश्व मानव अधिकार परिषदेचे प्रदेश सचिव सय्यद शफी बाबा, अहमदनगर जिल्हाध्यक्ष अज्जु  शेख, शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उजागरे, मोहसीन चाऊस, संदीप जगताप, चिराग जाधव, सचिन जगताप, सागर शिरसाट, प्रवीण भापकर यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक कटके ते म्हणाले की, नगर जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचे रेकॉर्ड तयार करून त्यांच्यावर पोलीस प्रशासनाच्यावतीने नजर ठेवली जाणार आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी येत्या काही दिवसात कठोर असे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस दलसक्षम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment