अद्ययावत शासकीय ग्रंथालय उभारणार : आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 27, 2020

अद्ययावत शासकीय ग्रंथालय उभारणार : आ. जगताप

 अद्ययावत शासकीय ग्रंथालय उभारणार : आ. जगताप

जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहराला वैभवशाली अशी साहित्य, कला व ऐतिहासीक परंपरा लाभलेली आहे. वाचन हा या परंपरेचा पाया असून शहरात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी तसेच युवकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शहरात अद्ययावत असे भव्य शासकिय ग्रंथालय उभारणार असल्याचे आ. संग्राम जगताप यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचे ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी अंक प्रदर्शनाचे उदघाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी मनपा स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, नगरसेवक गणेश भोसले, अजिंक्य बोरकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, रामदास शिंदे, हनुमान ढाकणे, संदीप नन्नवरे, शैलश घेगडमल, अजय बारवकर, गणेश शेलार, सादिक शेख, सागर लोंढे, अमित सरोदे, महिमा कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी आ संग्राम जगताप यावेळी म्हणाले की, दिवाळी अंक म्हणजे वाचकांसाठी मेजवानी आहे. दिवाळी अंकांच्या माध्यमातून विविध विषय मांडले जातात. ग्रंथालय चळवळ व्यापक होण्यासाठी ग्रंथालय व वाचन संस्कृती टिकवणे गरजेचे असून नवीन ग्रंथालये उभारण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आ जगताप यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर म्हणाले की, अहमदनगर जिल्हयाचा भौगोलीक विस्तार मोठा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्रंथालये आहेत. वाचन संस्कृती वाढण्यासाठी आणखी ग्रंथालये निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यावेळी भारतीय संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे वाचन करण्यात आले आमदार महोदयांना भारताचे संविधानाची प्रत भेट देऊन स्वागत करण्यात आले. दिवाळी अंकांचे प्रदर्शन नगरकरांसाठी 15 डिसेंबर पर्यंत खुले आहे त्याचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here