प्रशासन व ठेकेदारांचे दुर्लक्ष; अमृत पाणी योजना रखडली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, November 25, 2020

प्रशासन व ठेकेदारांचे दुर्लक्ष; अमृत पाणी योजना रखडली.

 प्रशासन व ठेकेदारांचे दुर्लक्ष; अमृत पाणी योजना रखडली.

ठेकेदार, अधिकार्‍यांनी कामाला गती न दिल्यास कारवाईचा स्थायीचे सभापती मनोज कोतकरांचा इशारा.


अहमदनगर (नगरी दवंडी/प्रिंतनिधी) ःअमृत पाणी योजनेच्या कामाला उशीर होत आहे. याचे सर्व जबाबदारी प्रशासक व ठेकेदार यांची आहे. प्रशासक या योजनेच्या कामावर कधीही भेट देत नाही. त्याठिकाणचे प्रश्न जाणून घेत नाही. आपआपल्या कार्यालयात बसूनच, फोनवरून माहिती घेतात व कागदपत्र रंगवतात त्यामुळे नगर शहराच्या विकास कामांना गती मिळत नाही. 4 वर्षे होवूनही अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण होवू शकले नाही. 36 कि.मी. पैकी सुमारे 23 कि.मी. पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून अजून 13 कि.मी चे काम बाकी आहे. मुळाधरण येथे पंपींगचे कामही बाकी आहे. तसेच ओढे व नदयांवरील पाईप टाकण्याच्या पुलाचे काम बाकी आहे. पुढील सहा महिन्यात ही योजना मार्गी लागावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. ही योजना मार्गी लागल्यानंतर नगर शहराला पूर्ण दाबाने पाणी मिळेल. यासाठी ठेकेदार व अधिकारी यांनी आपआपल्यामधील मतभेद विसरून एकमेकांवर जबाबदारी ढकलू नये. आपआपली जबाबदारी पार पाडावी व या योजनेच्या कामाला गती दयावी. अन्यथा कारवाई करावी लागेल. अशी माहिती स्थायी समितीचे सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी दिली.

श्री कोतकर पुढे म्हणाले की, नगर शहराला मुळा धरण येथून पाणी पुरवठा करणार्‍या योजनेला अनेक वर्षे झाले असल्यामुळे वांरवार लिकेज होण्याचे काम होत आहे यासाठी केंद्र सरकारने मागील 4 वर्षा पूर्वी अमृत पाणी योजनेचे काम मंजूर केले आहे.  कारण शहराचा पुढील 50 वर्षाचा विचार करून ही पाणी योजना मंजूर झाली आहे.  ठेकेदार व प्रशासकीय हलगर्जीपणामुळे या योजनेच्या कामाला गती मिळत नाही. वारंवार सुचना करूनही प्रशासकीय यंत्रणा काम करित नाही. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी या योजनेच्या कामामध्ये अडथळा निर्माण केला आहे. तो सोडविण्याचे कामही मा.महापौर व आम्ही करत आहोत . वारंवार या योजनेच्या कामाची पाहणी करून सुचना दिल्या जातात. परंतु त्या प्रशासकीय पातळीवर अमलात आणल्या जात नाही. शेतकर्‍यांचे पंचनामे होवूनही वेळेवर त्यांना धनादेश दिला जात नाही. त्यामुळे त्यांच्या शेतातून पाईप टाकून देत नाही. शेतकर्‍यांनी  पुन्हा दुसरे पिक घेतल्यानंतर शेतकरी जुने पंचनामे ग्राहय धरत नाही. त्यामुळे पुन्हा पंचनामे करावे लागतात. यामध्ये अनेक दिवस वाया जात आहे.
अमृत पाणी योजनेची पाहणी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी केली यावेळी अभियंता पुंड, ठेकदार व शेतकरी उपस्थित होते. यावेळी मनोज कोतकर यांनी विळद येथील पंपींग स्टेशनच्या कामाची पाहणी केली. तसेच या योजनेमध्ये अडवणुक शेतकर्‍यांची भेट घेवून विनंती केली. काम सुरू केले. तसेच मुळाधरण येथील कामाची माहिती घेतली. ही योजना वनविभागाच्या जागेतून येणार असल्यामुळे वनविभागाच्या अधिकारी यांची भेट घेणार आहे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here