लोकशाही बळकट होण्यासाठी नवीन मतदार नोंदणी होणे गरजेचे ः शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, November 23, 2020

लोकशाही बळकट होण्यासाठी नवीन मतदार नोंदणी होणे गरजेचे ः शिंदे

 लोकशाही बळकट होण्यासाठी नवीन मतदार नोंदणी होणे गरजेचे ः शिंदे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सध्या महाराष्ट्रात  नवीन मतदार नोंदणी मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिम चालू आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील कामे सुरु आहे. परंतु अहमदनगर मधील बुथ लेव्हल आँफिसर (लश्रे) म्हणून कार्य करणारे शिक्षक प्रसाद शिंदे यांनी अभिनव कल्पना राबवून ही मोहिम अधिक योग्य पध्दतीने अंमलबजावणी साठी वेगवेगळ्या कल्पना राबवल्या आहेत.कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन शिंदे यांनी आपल्या यादी भागातील नागरिकांना भेटून ुहरीीं रिि र्सीेीि सुरु केले.आणि ग्रूपच्या माध्यमातून नागरिकांना माहिती पुरवणे अडचणी संदर्भात मार्गदर्शन करणे मोबाईल नंबर प्रसिद्ध केला.तसेच ठराविक ठिकाणी जाऊन नवीन मतदार नोंदणी साठी जनजागृती केली.आणि जास्तीत जास्त नागरिकांना आपला अधिकार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
 या प्रसंगी प्रसाद शिंदे यांनी नवीन मतदार मोहिमेबद्दल  माहिती दिली आहे की  ही मोहिम अत्यंत महत्त्वाची आहे तसेच लोकशाहीने संविधानाने नागरिक म्हणून आपल्या जो अधिकार दिला आहे त्याचा सर्वांनी वापर करावा तसेच कोरोना परिस्थिती असल्यामुळे कामाची रुपरेषा बदलली आहे प्रत्यक्ष भेट देणे शक्य होत नाही ठराविक ठिकाणी भेटी दिल्या आहे मोहिमेबद्दल पुढील माहिती दिली आहे
नवीन मतदार नोंदणी मोहीम-17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020ॠ आँनलाईनसाठी थथथ.र्पीीिं.ळप वर जाऊन अर्ज देखील अर्ज करु शकता.
तसेच नमुना अर्ज क्र 6-मतदार यादीत नाव समाविष्ट करणे. एका मतदार संघातून दुसर्‍या मतदार संघात स्थलांतरीत झाल्यास नाव समाविष्ट करणे. नमुना अर्ज क्र 7-मतदार यादीतील नाव वगळणे , मतदार यादी नोंदीबद्दल आक्षेप घेणे, नमुना अर्ज 8 -मतदार यादीतील तपशीलामध्ये दुरुस्ती करणे, नमुना अर्ज क्रमांक 8अ- एकाच मतदारसंघात एका यादीतून दुसर्‍यायादीत स्थलांतर झाल्यास पत्ता बदल करणे. आवश्यक  कागदपत्रे-एक फोटो ओळखपत्र व रहिवासी पुरावा जोडणे आवश्यक आहे. वयाचा पुरावा-पँन कार्ड,जन्माचा दाखला,ड्रायव्हिंग लायसन्स/ राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक,10/12/ मार्कशीट रहावासी पुरावा, आधारकार्ड, रेशन कार्ड, वीज बील, मालमत्ता कर पावती, पाणीपट्टी पावती, नवविवाहीत महिलांसाठी-माहेरकडील मतदार यादीतुन नाव कमी केल्याचा दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र/नाव बदलण्याचे स्वयंघोषणापत्र. अशा सर्व गोष्टी बाबतीत जागृत राहून आपली मतदार नोंदणी आपल्या गाव पातळीवर,शहरात  प्रक्रिया पुर्ण करावी.

No comments:

Post a Comment