निंबळकच्या दिवाळी क्रिकेट स्पर्धेत अश्वमेध कुकाणा संघ विजयी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, November 23, 2020

निंबळकच्या दिवाळी क्रिकेट स्पर्धेत अश्वमेध कुकाणा संघ विजयी

 निंबळकच्या दिवाळी क्रिकेट स्पर्धेत अश्वमेध कुकाणा संघ विजयी

खेळात व जीवनात नियोजन महत्त्वाचे -अजय पवार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी दिवाळीत निंबळक (ता. नगर) येथे दोस्ती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ट्रस्टच्या वतीने माजी सरपंच कै. संजय लामखडे यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणारी दिवाळी क्रिकेट स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली. सलग सहा दिवस शहर व ग्रामीण भागातील संघात सकाळ, दुपार दोन सत्रात चाललेल्या क्रिकेटचा थरार ग्रामस्थांना अनुभवयास मिळाला. स्पर्धेचा अंतिम सामना अश्वमेध कुकाणा (ता. नेवासा) संघ विरुध्द निंबळक क्रीडा मंडळ यांच्यात अंत्यत चुरशीचा झाला. यामध्ये अश्वमेध कुकाणा संघाने 107 धावांचे लक्ष गाठत दणदणीत विजय मिळवला.  
निंबळक क्रीडा मंडळाने अंतिम सामन्यात पहिली फलंजादी स्विकारुन 10 षटकात 107 धावांचे लक्ष अश्वमेध कुकाणा संघापुढे ठेवले. अश्वमेध कुकाणा संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करीत नऊव्या षटकात विजयाचे लक्ष गाठले. क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण माजी जिल्हा  क्रीडा अधिकारी अजय पवार व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहा. सहा. पो.नि. मोहन बोरसे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच विलास लामखडे, बाबासाहेब आबूज मेजर, डॉ. प्रशांत सिनारे, ग्रामसेवक अनिल भाकरे, उद्योजक अजय लामखडे, अविनाश अळंदीकर, बाळासाहेब कोतकर, ग्रामपंचायत सदस्य नाना दिवटे, बाबासाहेब पगारे, अंबादास शेळके, सुनिल जाजगे, अ‍ॅड. दिलीप म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, इंजी. सचिन गवारे आदींसह खेळाडू, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.  
प्रास्ताविकात विलास लामखडे यांनी दिवाळीच्या सुट्टीत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगून, 40 वर्षापासून अखंडपणे चालू असलेल्या क्रिकेट स्पर्धेचा आढावा घेतला. तर विविध खेळांना प्रोत्साहन दिल्याने गावातील अनेक युवक पोलीस व लष्करामध्ये दाखल झाले असल्याचे सांगून, निर्व्यसनी युवा पिढी घडविण्यासाठी युवकांना मैदानी खेळाची आवड निर्माण होण्याचा या स्पर्धेमागचा उद्दीष्ट असल्याचे स्पष्ट केले.
सहा. पो.नि. मोहन बोरसे म्हणाले की, प्रतिकुल परिस्थितीमध्ये मिळवलेल्या यशाचा आनंद वेगळा असतो. परिस्थितीवर मात करुन जो पुढे जातो तोच खरा खेळाडू असतो. खेळाने युवकांमध्ये खेळाडूवृत्ती निर्माण होत असते. तर खेळाडूवृत्ती अंगिकारल्यास तो व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अजय पवार यांनी खेळात व जीवनात नियोजन महत्त्वाचे असते. निंबळक गावातून अनेक राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडले असून, यामध्ये लामखडे परिवाराचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते अंतिम विजयी ठरलेल्या अश्वमेध कुकाणा संघास 31 हजार रु., उपविजयी निंबळक क्रीडा मंडळास 21 हजार रु., तृतीय विजयी आंबेश्वर ट्रेडर्स (नगर) संघास 11 हजार रु. व चतुर्थ निंबळक वॉरियर्स संघास 7 हजार रुपयाचे रोख बक्षिस व चषक देण्यात आले. तसेच मॅन ऑफ दी सिरीज ठरलेला अक्षय जर्हाड (कुकाणा), उत्कृष्ट फलंदाज अतुल मगर (निंबळक क्रीडा मंडळ) मॅन ऑफ द मॅच मयुर सोनवणे (कुकाणा), उत्कृष्ट गोलंदाज गौरव कापसे (कुकाणा) यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. त्याचबरोबर ग्रामस्थांनी देखील उत्कृष्ट खेळाडूंना रोख बक्षिसे दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here