महाविकास आघाडी सरकारकडून वाढीव बिलाबाबत यूटर्न- शिवाजीराव कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, November 23, 2020

महाविकास आघाडी सरकारकडून वाढीव बिलाबाबत यूटर्न- शिवाजीराव कर्डिले

वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर आघाडी सरकारला शॉक देण्यासाठी भाजपाचे विजबिल होळी आंदोलन

महाविकास आघाडी सरकारकडून वाढीव बिलाबाबत यूटर्न- शिवाजीराव कर्डिले

महाविकास आघाडी सरकारकडून वीज ग्राहकांची फसवणूक- महेंद्र उर्फ भैय्या गंधेनगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या काही दिवसांपासून वाढीव वीजबिलावरून राजकारण चांगलेच तापले आहे. नागरिकही आक्रमक झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून आज वीजबिलाविरोधात आंदोलन करून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजप वीज बिलांची होळी करण्यात आली. माजी मंत्री आणि भाजप नेते शिवाजीराव कर्डिलेे व भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र गंधे रस्त्यावर उतरले असून, त्यांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. महावितरणने टाळेबंदीच्या काळात राज्यातील जनतेला चुकीची व भरमसाठ बिले पाठविली होती. या बिलांबाबत नागरिकांना सवलत देण्याचे शासनाने जाहिर देखील केले होते. मात्र आता या वाढीव बीलाबाबत सरकारने यु टर्न घेत जनतेचा विश्वासघात केला असल्याची टीका माजी मंत्री व भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांनी केली.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक, दुर्बल आणि मध्यमवर्गीय लोकांचं वीजबिल माफ करू, अशी घोषणा केली होती. परंतु हे सरकार आता पलटलं आहे. या सरकारनं दीड कोटी ग्राहकांवर अन्याय करण्याचा घाट घातला आहे, असा आरोप भाजपा शहर जिल्हाअध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केला आहे. महावितरणने पाठवलेल्या वीजबिलाची होळी करून ‘राज्य सरकारने 8 दिवसांत थकीत वीजबिलाची चौकशी करावी, शेतकर्‍यांकडे थकीत असलेलं वीजबिल काही भ्रष्टाचार नाही, पण वीजबिल माफी करावी,’ अशी मागणी यावेळी शिवाजीराव कर्डिले व गंधे यांनी केली आहे.
नगर बाजार समिती येथे भाजपाच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात वीज बीलांची होळी करुन आंदोलन करण्यात आले. यावेळी श्री कर्डिले म्हणाले की, कोरोना टाळेबंदीच्या काळात उत्पन्नाचे स्त्रोत बंद पडल्यामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडली होती. अशा परिस्थितीत राज्यातील आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे सर्वसामान्य कष्टकरी जनतेला अर्थसहाय्य करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता वाढीव वीज बिले पाठवली. नंतर सवलत देऊ असे सांगितले आणि आता जनतेचा विश्वासघात करत पूर्ण बील भरावे लागेल कोणतीही सवलत मिळणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे सत्ताधुंद सरकारला जाग आणण्यासाठी आज भाजपाच्यावतीने राज्यभर वीज बीलाची होळी करुन आंदोलन करण्यात येत आहे.
कोरोना टाळेबंदीच्या काळातील वीज बिलाबाबत सवलत देण्याचे सरकारने जाहिर केले होते, मात्र आता उर्जामंत्र्यांनी याबाबत जनतेची फसवणुक करत कोणतीही सवलत देता येणार नसल्याचे सांगून नागरिकांना पूर्ण बील भरावे लागेल असे जाहिर केले. त्यामुळे आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नसून हे सरकार फसवे असल्याची टीका भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भैया गंधे यांनी केली. कोट्यवधी जनता वाढीव वीजबिलामुळे भरडलेली आहे. या सरकारनं वीजबिल माफ केलं नाही, म्हणून आम्ही वीजबिलांची होळी केली. महाराष्ट्रात 2 हजार ठिकाणी वीजबिलांची होळी होणार आहे. तरीही सरकार ऐकलं नाही आणि कोणी वीज कापायला आले तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झेंडे घेऊन त्यांना विरोध करतील, असा इशाराही कर्डिले यांनी दिला आहे. राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी आज भाजपतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात आली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भाजपाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केले होते. पाटील यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी तालुक्यात ही हे आंदोलन करण्याचे आव्हान केले होते. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे. यात नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार सहभागी झाले आहेत. यांच्यासह इतरही नेते या आंदोनलात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी भानुदास बेरड म्हणाले की, नगर जिल्ह्यात बिबटया सारख्या नरभक्षक हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत आहे. दिवसा वीज पुरवठा होत नसल्याने शेतकर्‍यांना रात्रीच्या वेळी पीकांना पाणी देण्यासाठी शेतावर जावे लागते. त्यामुळे अंधारात बिबटया हल्ला करतो. त्यामुळे सरकारने ग्रामीण भागात दिवसा वीजपुरवठा करावा. राज्यातले सध्याचे आघाडी सरकार हे सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांची बिले हे सरकार माफ करते, मात्र सर्वसामान्य जनता व शेतकर्‍यांची वीज बिले कमी करण्यात सरकारला स्वारस्य नाही ही मोठी शोकांतीका आहे.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते सुनिल रामदासी, प्रा. भानुदास बेरड, उपमहापौर मालनताई ढोणे, महीला व बालकल्याण समिती सभापती लताताई शेळके, अ‍ॅड विवेक नाईक, जगन्नाथ निंबाळकर, सुवेंद्र गांधी, अनिल गट्टाणी, अनिल सबलोक, महेश नामदे, नगरसेवक रविंद्र बारस्कर, तुषार पोटे, बाळासाहेब कोतकर, अजय ढोणे, कालिंदी केसकर, रेखा मैड, संध्या पावसे, सुधा लाटे, नवनाथ टिमकर, बाळासाहेब गायकवाड, सतिश शिंदे, सुजीत खरमाळे, लक्ष्मीकांत तिवारी, चंद्रकांत पाटोळे, अ‍ॅड. चंदन बारटक्के, नरेश चव्हाण, सचिन चोरडीया, पंकज जहागीरदार, वसंत राठोड, अविनाश साखला, मनोज ताठे, दत्ता गाडळकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
नगर बाजार समिती समोर करण्यात आलेल्या आंदोलना प्रसंगी आ बबनराव पाचपुते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री अरुण मुंढे, अक्षय कर्डिले, सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, मनोज कोकाटे, दिलीप भालसिंग, विलास शिंदे, बाळासाहेब महाडीक, रमेश पिंपळे, रेवणन्नाथ चोभे, बबन आव्हाड, गिताराम नरवडे, सुमित कोठुळे, देविदास आव्हाड, सुरेश सुंबे, शुभम भांबरे, मधुकर मगर आदींसह भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे म्हणाले की, हे आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत असून कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात सरकारचा वेळ जात आहे. अतिवृष्टी, कोरोना आदी संकटांना सामोरे जाण्यासाठी सरकारकडे कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे जनता आता फार काळ या सरकारला खुर्चीवर बसू देणार नाही. नगर बाजार समिती येथे भाजपाच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात वीज बीलांची होळी करुन आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आ बबनराव पाचपुते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री अरुण मुंढे, अक्षय कर्डिले, सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, मनोज कोकाटे, दिलीप भालसिंग, विलास शिंदे, बाळासाहेब महाडीक, रमेश पिंपळे, रेवणन्नाथ चोभे, बबन आव्हाड, गिताराम नरवडे, सुमित कोठुळे, देविदास आव्हाड, सुरेश सुंबे, शुभम भांबरे, मधुकर मगर आदींसह भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here